Nagpur News: राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनीच काही महिला बचत गटांच्या पदाधिकाऱ्यांशी हातांशी पकडून मोठा घोटाळा (Scam) केल्याचा प्रकार पुढे आला आहे. यात तब्बल 8 कोटी 71 लाख रुपयाचे कृषी पूरक साहित्य वाटपात घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.


दरम्यान, हा संपूर्ण प्रकार पुढे आल्यानंतर आणि यातील महिला तक्रारदार पुढे आल्यानंतर  रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे (Shyamkumar Barve) यांनी प्रधानमंत्री कार्यालयाला हा संपूर्ण प्रकार लक्षात आणून दिला आहे. सोबतच या प्रकरणाची लेखी तक्रार देखील केली आहे. परिणामी, प्रधानमंत्री कार्यालयाने नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहे.


 नेमकं प्रकरण काय? 


जिल्ह्याच्या खनिज निधीतून 100 महिला बचत गटाला कृषिपूरक साहित्य वाटण्याची योजना तयार करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी त्यासाठी 100 महिला बचत गटाची निवड केली आणि साहित्याचा वाटप केला गेला. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी फोटो काढून योजना यशस्वी झाल्याचे दाखवले. मात्र काही दिवसानंतर  पुरवठादाराने वितरित साहित्य परत नेलं असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे 


चार ते पाच हजार फी ऐवजी 41 ते 42 हजार फी, नामांकित शिक्षण संस्थेतील प्रकार


पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था असणारी आयएस लॉ कॉलेज या शिक्षण संस्थेमध्ये अगदी माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे यासह राज्यातील अनेक बड्या वकिलांनी शिक्षण घेतलं. त्याच शिक्षण संस्थेमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारातून मागितलेल्या माहितीनुसार ज्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतच नाही त्यातून हजारो टक्के नफा महाविद्यालय मिळवत असल्याचे समोर आले आहे.  महाविद्यालयाला शासनाकडून अनुदान देखील मिळत तरी देखील महाविद्यालय इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांकडून लूट का उकळत आहे?  अशा प्रकारचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच यातून कमावलेला पैसा नेमका कुठे जातोय? हा देखील प्रश्न सध्या विद्यार्थ्यांसमोर पडला आहे. मात्र विद्यार्थ्यांनी याला वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले तर विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे 


इतर महत्वाच्या बातम्या