सातारा : नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमात त्रुटी उघड झाल्याने निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा आरोप शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला. निकालाची तारीख ऐनवेळी बदलून 20 दिवसांचा गॅप ठेवण्यात आला, त्यामुळे ईव्हीएममध्ये घोळ होणार अशी लोकांमध्ये चर्चा असल्याचंही ते म्हणाले. 

Continues below advertisement

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावेळीच मी सांगितले होते की एकही त्रुटी न्यायालयात प्रलंबित राहिली तर निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पुढे ढकलली जाईल आणि तसेच घडले, असे त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला याची माहिती होते, तर जबाबदार मुख्यमंत्री आणि निवडणूक आयोगाला हे कसे माहिती नसावे? घाईगडबडीत घेतलेल्या निवडणुका हे निवडणूक आयोगाचे फेल्युअर आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

Shashikant Shinde Speech : EVM मध्ये घोळ होणार अशी चर्चा

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, "मतमोजणीसाठी ठेवलेला 20 दिवसांचा गॅप लोकांच्या मनात संशय निर्माण करणारा आहे. लोक खुलेपणाने चर्चा करत आहेत की या काळात EVM मशीनमध्ये काहीतरी घोळ होऊ शकतो. हे सरकार आणि निवडणूक आयोग दोघांचेही फेल्युअर आहे."

Continues below advertisement

ईव्हीएमबाबत लोकांचा विश्वास ढळत असेल तर सरकार या मशीचा इतका आग्रह का धरत आहे? लोकांच्या मनात शंका निर्माण होत असेल तर येणाऱ्या काळात विना-EVM निवडणुका घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले. 

अतिवृष्टीबाबत केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याने शिंदेंनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. अतिवृष्टीचा प्रस्ताव अजूनही केंद्राला न पाठवल्याने आमदार शिंदे यांनी सरकारला असंवेदनशील ठरवले. ते म्हणाले की, "या सरकारला शेतकऱ्यांकडे बघायला वेळ आहे का? कृषिमंत्र्यांच्या खुर्चीवर कोणी टिकत नाही, हा शेतकऱ्यांचा शाप आहे का माहित नाही. “शेतकऱ्यांना सहा महिने, वर्षभरानंतर मदत देऊन काही उपयोग नाही."

मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार पूर्णपणे अपयशी आहे असं शशिकांत शिंदे म्हणाले.

Shashikant Shinde On Election : निवडणूक प्रक्रिया फक्त दिखावा

शशिकांत शिंदे म्हणाले की, "सरकारमध्येच सर्व ठेकेदार बसले आहेत. साताऱ्यात आमचे उमेदवार सामान्य कार्यकर्ते आहेत. निवडणूक प्रक्रिया आता फक्त फार्स राहिली आहे. प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या हातातले बाहुले आहे, ते सांगतात एक आणि दुसरेच करतात."

ही बातमी वाचा: