SSC Exam Satara : दहावीच्या परीक्षेशी संबंधित एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यात समोर आला आहे. फलटण (Phaltan) तालुक्यातील विडणी गावातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये शिक्षकानं थेट सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून दहावीच्या पेपरची तपासणी करून घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. वैभव शेंडे असं या शिक्षकाचं नाव असून दहावीचा मराठी विषयाचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींच्या मदतीनं तपासला जात असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भातील CCTV फुटेजही समोर आलं आहे. या घटनेमुळं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Satara School Controversy : CCTV फुटेजमुळं प्रकरण उघड

शिक्षक वैभव शेंडे हे दहावीच्या मराठी विषयाचे पेपर तपासत असताना सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून मदत घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण घटनेचा CCTV फुटेज समोर आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या घटनेनंतर संबंधित शिक्षकावर शिक्षण विभागाकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

School Response : मुख्याध्यापिकांनी बोलण्यास नकार

या प्रकरणाबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी शिर्के यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी फोनवर बोलण्यास नकार देत प्रत्यक्ष भेटून माहिती देऊ, असं सांगितलं. 

Continues below advertisement

Pune Paper Leak : पुण्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक

दरम्यान, राज्यात दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणात पार पडाव्यात यासाठी राज्य मंडळाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र तरीही विविध गैरप्रकार समोर येत आहेत. नागपूरमधील पेपर फुटीच्या प्रकरणानंतर आता पुणे जिल्ह्यात दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळं शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

Math Paper Leak Pune : तीन दिवस आधीच प्रश्नपत्रिका ग्रुपवर

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या गणित विषयाची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्यापूर्वीच एका टेलिग्राम ग्रुपवर शेअर करण्यात आली होती. विशेष म्हणजे गणित भाग-2 चा पेपर परीक्षा होण्याच्या तीन दिवस आधीच ग्रुपवर टाकण्यात आला होता. बोर्डानं अधिकृत प्रश्नपत्रिकेशी पडताळणी केल्यानंतर दोन्ही पेपर तंतोतंत जुळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पुणे बोर्डानं पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :