Satara: एकीकडे महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळण्यास सुरुवात झाली असताना साताऱ्यातील वाईमध्ये लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिलंय. या पत्रात देवभाऊ ओवाळणीत 1500 नको तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या अशी मागणी त्यांनी केलीय.  

दरम्यान, मागील 22 दिवसांपासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेल्या दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी हा लॉंग मार्च काढण्यात आलाय.यात महिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे रक्ताने पत्र लिहीत न्यायाची ओवाळणी मागितलीय

नेमकं प्रकरण काय ?

मागील 22 दिवसापासून वाई ते मुंबई मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढला आहे. वाई तालुक्यातील बेकायदेशीर पद्धतीने सुरू असलेला दगडी खान क्रेशर बंद करण्यात यावा या मागणीसाठी हा लोक मार्च काढण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर असलेल्या रक्षाबंधनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणून बेकायदेशीर क्रेशर बंद करण्यात यावा अशा मागणीसाठी लाडक्या बहिणींनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिले आहे.

रक्षाबंधनाची भेट दीड हजार रुपये नको प्रेशर बंद करा आम्हाला न्याय द्या अशी भावनिक साद यावेळी वाईतील महिलांनी केली आहे..या पार्श्वभूमीवर महिलांनी रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून अनोखी मागणी केली. “देवा भाऊ, ओवाळणीत दीड हजार नको, तुमच्या लाडक्या बहिणींना अवैध क्रेशर बंद करून न्याय द्या,” असा भावनिक संदेश त्यांनी पत्रातून दिला. 

लाडक्या बहिणीचे जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात 

महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जातो. जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं होतं त्याप्रमाणं जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.