Continues below advertisement

सातारा : जिल्ह्याच्या फलटण (Satara) तालुक्यातील 35 वर्षीय युवकासोबत बनावट इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवरून महिला असल्याचे भासवून चॅटिंग केल्याचा भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे संबंधित युवकाला खंडणीची मागणी करणाऱ्या तीन जणांना शिरवळ पोलिसांनी (Police) अटक केली आहे. सध्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फसवणुकीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. तसेच, ऑनलाईन पैशांची मागणी किंवा आधार ओटीपीच्या कारणाने पैसे लाटण्याचा प्रकारही घडत आहे. त्यातच, आता सातारा जिल्ह्यात त्याने ती बनून एका युवकाला फसवल्याचं उघडकीस आला आहे.

बनावट इंस्टाग्राम अकाउंट महिला असल्याचे भासवून फलटण येथील युवकाला चॅटींगद्वारे शहरातील वीर धरण परिसरात बोलावण्यात आले होते. त्यानंतर, येथे तीन जणांकडून संबंधित युवकाला मारहाण करत लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर संबंधित युवकाने शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली असता अवघ्या एक तासात शिरवळ पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत यामधील तिही आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटक केलेल्यांमध्ये एक युट्यूबर असून एक मसनेचा तालुकाध्यक्ष आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Continues below advertisement

पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी युट्युबर किरण मोरे, सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेला संशयित विशाल जाधव आणि मनसे तालुकाध्यक्ष इरफान शेख यांचा समावेश आहे. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आरोपींकडून याआधीही असे प्रकार घडले असल्यामुळे पोलिसांनी कोणाची तक्रार असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना केले आहे. मात्र, इंस्टाग्रामवरुन किंवा सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर महिला अकाऊंटशी मैत्री करताना, चॅटिंग करताना किंवा त्या अकाऊंटवरुन गाठी-भेटी घेताना अगोदर संपूर्ण खात्री करायला हवी, हाच धडा या घटनेतून शिकायला मिळतो.

हेही वाचा

शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर जीवघेणा हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये शूट