Sharad Pawar: राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानतंर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आता पक्षबांधणीसाठी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली आहे. पुण्यापासून ते प्रितीसंगमापर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यामध्ये रविवारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांचाही समावेश आहे. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, तसेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे साक्षीदार असणारे बालदोस्त सातारचे खासदार श्रीनिवास पाटील तसेच मतभेद असूनही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार यांनी (Sharad Pawar) सातारमध्ये येण्याचे कारणही सांगितले. कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल तर मी दोन शहर निवड करतो सातारा आणि कोल्हापूर. ते पुढे म्हणाले की, आज गुरुपौर्णिमा आहे. त्यामुळे आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात जनमानस तयार करण्यासंबंधीचा निकाल काल आम्ही घेतला. याची सुरुवात करायची असेल तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीशिवाय दुसरे स्थळ नाही. तुमचे, माझे, सगळ्यांचे गुरु, या पदावर जाऊन मार्गदर्शन करण्याचा अधिकार एकाच व्यक्तीला होता ती व्यक्ती म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या स्मृतिस्थळी याठिकाणी आपण प्रचंड संख्येने आलेत. या प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद देतो.
ते म्हणाले की, आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत.
आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य आहे. पण मध्यंतरीच्या कालखंडात याच महाराष्ट्रात कोल्हापूर, संगमनेर, अकोला अशा काही ठिकाणी पिढ्या न पिढ्या एकत्र राहणाऱ्या समाजात एक प्रकारची वैर भावना वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. यातून जातीय दंगे झाले जे महाराष्ट्राला शोभणारे नसल्याचे शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या