सातारा : राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील (IPS) 17 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख (Sameer Shaikh) आणि ठाणे येथील पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची देखील बदली करण्यात आली होती. समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली होती. तर, सुधाकर पठारे हे सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक झाले असते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या दोघांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. 


समीर शेख, सुधाकर पठारेंच्या बदलीला स्थगिती का?


राज्यातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात बदलीला स्थगिती देण्यात आल्याचं पत्र जाहीर करण्यात आलं.   केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन तात्काळ  सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर आणि समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असं कळवण्यात आलं आहे. 


अगोदर बदली नंतर स्थगिती


राज्य सरकारच्या गृह विभागाकडून सुधाकर पठारे आणि समीर शेख यांची बदली करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातचं पुन्हा या दोघांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. कायदेशीर बाबींचा विचार करुन या दोघांच्या बदलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. अगोदर बदली अन् नंतर स्थगिती याबाबत चर्चा सुरु आहेत.


अधिकाऱ्याचं नाव, कुणाची बदली कुठं झाली


अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक धाराशिव येथून  पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीणला बदली


श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली


अनुराग जैन, पोलीस उप आयुक्त नागपूर शहर येथून पोलीस अधीक्षक हिंगोली पदावर बदली 


विश्व पानसरे , गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक पदावरून पोलीस अधीक्षक, बुलढाणा पदावर नियुक्ती 


शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक ग्रामीण, सोलापूर येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे  पोलीस अधीक्षक पदी बदली


संजय वाय जाधव, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक धाराशिव येथे बदली


कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथून पोलीस अधीक्षक यवतमाळ पदी बदली. 


आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा येथून समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 येथे बदली. 


नंदकुमार ठाकूर, प्राचार्य पोलीस प्रशिक्षक केंद्र दौंड,


निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार येथून  प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड


पवन बनसोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ येथून राज् गुन्हे अन्वेषण विभागाच्या, कार्यालयात बदली. 


नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक पदावरुन समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 , नवी मुंबईत बदली 


अमोल तांबे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथून पोलीस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पुणे महानगर  प्रदेश विकास प्राधिकरण येथे बदली


मनीष कलवानिया, पोलीस उप आयुक्त मुंबई शहर पदी नियुक्ती


संंबंधित बातम्या :


IPS Transfer : राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी