सातारा: भाजप नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य करत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली आहे. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलो आहे. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिले आहे. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक गोष्टी षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा..काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी रामराजे निंबाळकरांवर (Ramraje Naik Nimbalkar) हल्लाबोल केला आहे.(Jaykumar Gore)
फलटणच्या विकासावर ही निवडणूक झाली नाही. यांना कुठ जायचं आहे हे माहीत नव्हते हे कधीच लढवय्ये नव्हते. दुसऱ्याला त्रास देऊन सत्तेत राहिले. फलटणमध्ये खूप दहशत आहे, हे शिवसेनेत चालत नाही असं कोणीतरी म्हणाले. आमच्या नादी लागले ते पहिले कोरेगाव नंतर उत्तर कराड आणि फलटणचे.. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही.. पण आमच्या नादी लागला तर आम्ही सोडत नाही..यांची सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आणि याचा अस्त नगरपालिका निवडणूकीतुन झाला. यांना राजे म्हणणे हे चुकीच आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या आडून राजकारण केले असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.
पुढे गोरे म्हणाले की, यांच्या अवस्था अभिनेता असरानी सारखी झाली आहे...अधे इधर अधे उधर...जो शब्द तुम्ही दिला तो पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. फलटणच्या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे गेलो म्हणून ही निवडणूक जिंकली. सर्वांना वाटते मी खूनशी आहे पण मी स्पष्ट वक्ता आहे.या जयकुमार गोरेला कोणी आमदार केला तो या पंचायत समितीने केला. या ठिकाणी 16 ग्रामपंचायतीला कार्यालय नव्हती तर रामराजे(महाराज) काय करत होते. आपण तीस वर्ष काय केले. जयकुमार गोरेचा शब्द आहे. 200 कोटी रुपयाचे रस्ते देतो. ज्या ज्या शिक्षकांनी बुथवर उभे राहून राजकारण केले. अशा शिक्षकांची तक्रार द्या. ज्या शिक्षकांनी घर गड्याचं काम केलं, त्यांनी नोकरी सोडायची आणि त्या ठिकाणी पाणी भरायचं काम करायचं, यापुढे पुन्हा माफी नाही, असंही गोरेंनी म्हटलं आहे.
तर आता यापुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागा. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्हा परिषद लागेल. युद्ध हे शेवटचा शत्रू संपेपर्यंत जिंकता येत नाही. शत्रूंची धाकधूक सुरू आहे. ती संपवायचे आहे, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.