सातारा : एक लाखांपेक्षा जास्त लोक मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत. मागासवर्ग आयोग तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विशेष आदिवेशन घेऊन मराठा समाजाच्या आरक्षणावर निर्णय घेतला जाईल, ते टिकणारं आरक्षण असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पुण्यात धडकली आहे. पुण्यामध्ये अभूतपूर्व स्वागत करण्यात आल्यानंतर शासकी पातळीवर पुन्हा एकदा जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट आहे. मराठवाड्यात कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, त्या सुद्धा सापडू लागल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करण्यात आलं आहे. जरांगे पाटील यांना कालही विनंती केली होती, मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक आहे.
तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता
त्यांनी सांगितले की, सरकार आरक्षणासाठी सकारात्मक आहे. माझी मराठा समाजाला आणि जरांगे पाटिल यांना विनंती आहे. सरकार जर निगेटीव्ह असते, तर आंदोलनाचा मार्ग योग्य होता, म्हणून आंदोलन टाळले पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले. आतापर्यत न झालेलं काम सरकार करत आहे, त्यांनी समंजस्यची भूमिका घेतली पाहिजे. सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. सरकार ऐकणारे असून सर्वांच्या सुट्या रद्द करून हे सरकार कामाला लागलं आहे. पूर्ण टीम कामाला लागली असल्याचे म्हणाले. सरकारला तुम्ही सुचना करू शकता, असेही त्यांनी संगिततले.
लांडग्यांनी वाघाचं कातडं घातलं तरी ते वाघ होत नाहीत
दरम्यान, यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, लांडग्यांनी वाघाचं कातडं घातलं तरी ते वाघ होत नाहीत वाघ एकच फक्त बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे चाललो आहे. बाळासाहेबांचे विचार कोणी सोडले? बाळासाहेबांनी काँग्रेसला दूर ठेवलं. मिंधे कोण हे सर्व जनता जाणते, स्वार्थासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले. महाराष्ट्रात या भाजप आणि शिवसेना या युतीला निवडून दिले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. मग गद्दारी कोणी केली? अशी विचारणा शिंदे यांनी केली.
मोंदींवर बोलण्याचा काय अधिकार?
ते म्हणाले की, मोदीनी जे बाळासाहेबांचे स्वप्न 370 कलम,राम मंदीर बनवण्याचे स्वप्न पूर्ण केले त्यांचे आभार मानले पाहिजे होते. त्यांना साष्टांग दंडवत घालायला पाहिजे होता, पण हे काँग्रेसच्या खाली दंडवत घालत आहेत. बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, म्हणून त्यांना नैतिक अधिकार नाही. ये पब्लिक है सब जानती है येणाऱ्या निवडणुकीत बेईमानी, मिंधेपणाचं उत्तर जनता देईल.
इतर महत्वाच्या बातम्या