सोलापूर : फलटणमधील एका डॉक्टर तरूणीने तळहातावर कारण लिहून हॉटेलच्या एक रूममध्ये (Phaltan Doctor Case) आत्महत्या केली. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे होत आहेत, या प्रकरणातील मुख्य आरोपी पीएसआय गोपाळ बदने हा २०१३ मध्ये सोलापूर शहर पोलिस दलात भरती झाला होता. तो खात्याअंतर्गत परीक्षा देऊन पास झाला होता. दरम्यान, तो येथे शिपाई असताना त्याने जातीवाचक शिवीगाळ करत विनयभंग केल्याची तक्रार त्याच्याविरोधाक करण्याक आली होती. या प्रकरणी त्याची चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. फलटण येथील डॉक्टर तरूणीने (Phaltan Doctor Case) हातावर गोपाळ बदने याने अत्याचार केला तर प्रशांत बनकरने शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे लिहून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी प्रशांत बनकरला अटक केली तर गोपाळ बदने पोलिसांना शरण आला. त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.(Phaltan Doctor Case) 

Continues below advertisement

 Gopal Badne : दोन तपास अधिकारी बदलले

बदने याच्याविरुद्ध २०२१ मध्ये तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर त्यावर चौकशी करण्यात आली होती. या चौकशीदरम्यान पीडित महिलेने तपास अधिकाऱ्यांवर अविश्वास व्यक्त केल्याने दोन वेळा तपास अधिकारी बदलावे लागले होते. अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी पूर्ण करून ही तक्रार बंद केली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

बदने हा मूळचा परळी येथील असून, त्याने २०१३ मध्ये पोलिस सेवेत प्रवेश केला. शहर पोलिस दलात असताना त्याने शीघ्र प्रतिसाद पथक आणि वाहतूक शाखा यांसारख्या विविध विभागांमध्ये काम पाहिले. वाहतूक शाखेत कार्यरत असतानाच त्याने अंतर्गत पदोन्नती परीक्षेची तयारी सुरू केली आणि काही प्रयत्नांनंतर त्यात यश मिळवले. २०२२-२३ मध्ये तो फौजदार पदावर पदोन्नत झाला आणि प्रथमच त्याची बदली फलटण पोलिस ठाण्यात झाली होती, अशी माहितीही मिळाली आहे. यासंबंधीचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

Continues below advertisement

 Gopal Badne :  आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने आपला मोबाईल लपवला

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाळ बदने याने आपला मोबाईल लपवला असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांना शरण येण्यापूर्वी गोपाळ बदने याने त्याचा मोबाईल लपवला. पीएसआय गोपाळ बदनेच्या मोबाईलचा शोध पोलीस घेत आहेत. गोपाळ बदने पोलिसांकडून मोबाईल कोठे आहे याची माहिती लपवत आहे. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा असलेला पीएसआय गोपाल गोपाळ याचा मोबाईल आहे. तर दोन्ही आरोपीं महिला डॉक्टरच्या संपर्कात असल्याची कबुली पोलिसांना देखील दिली आहे. प्रशांत बनकर डॉक्टर महिलेच्या आत्महत्या करण्यापूर्वी देखील संपर्कात होता डिजिटल पुरावे शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी प्रशांत बनकर याला काही वेळा न्यायालयात हजर करणार आहेत.