Phaltan Doctor Death : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि जयश्री आगवणे (Jayshree Aagwane) यांच्याविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. 'सुषमा अंधारे यांनी 48 तासांमध्ये माफी मागावी', अशी नोटीस निंबाळकरांनी त्यांना पाठवली आहे. निंबाळकरांवर केलेल्या आरोपांच्या प्रकरणी हा दावा करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान केलेल्या कथित वक्तव्यांमुळे आपली बदनामी झाल्याचे निंबाळकर यांनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची एक नवीन फेरी सुरू होण्याची शक्यता आहे. निंबाळकर हे भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आहेत, तर सुषमा अंधारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या आहेत.
Phaltan Doctor Death : सुषमा अंधारे आणि जयश्री आगवणे यांच्याविरोधात 50 कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
फलटणमधील (Phaltan) महिला डॉक्टरच्या आत्महत्येमुळे राज्यातलं राजकारण तापलं असून, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. 'अशा संवेदनशील विषयाचं राजकारण करणारे हे दुर्दैवी लोक आहेत', अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे. दुसरीकडे, डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप करत, पुरावे नष्ट केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या समितीमार्फत करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या उप नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. दरम्यान याच आरोपांवरून आता रणजितसिंह नाईक निंबाळकर सुषमा अंधारेंवर अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचं वकिलांमार्फत म्हटलंय. तर त्यावर प्रतिक्रिया देताना अंधारे यांनी आपण माफी मागणार नाही, न्यायालयीन लढाई लढू. असा निर्धार केला आहे.
Ranjit Nimbalkar on Sushma Andhare : 48 तासात माफी मागावी
या प्रकरणी अधिक बोलताना रणजीत नाईक निंबाळकर यांचे वकील धीरज घाडगे म्हणाले कि, सुषमा अंधारे आणि जयश्री अगवणे यांच्यावर 50 कोटींचा दावा आणि जाहीर लेखी माफी मागावी, अशी आम्ही नोटीस पाठवली. आम्ही आज त्यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे. 50 कोटी आणि माफी मागावी. शिवाय 48 तासात माफी हि मागावी असं त्यात म्हटलं आहे. रणजित दादांनी एक देखील ऊस मुकादमा विरोधात नाही. फिट अनफिट संबंधित एकही प्रकरण झालेलं नाहीये. आज अखेर एकही तक्रार रणजित निंबाळकर यांनी मारहाण केलीय म्हणून नाहीये. एकही गुन्हा रणजित निबाळकर यांनी केलेला नाही. जयश्री अगावणे मोक्कामधील आरोपी आहेत. त्याच्यावर 353 चा गुन्हा आहे. सुषमा अंधारे वैयक्तिक पॉलिटिकल अजेन्डा राबवत आहेत. असा आरोप वकील धीरज घाडगे म्हणाले.
Adv. Dhiraj Ghadge : त्रास होत होता तर 3 वेळा बदलीची संधी असून फलटणच का मागितल?
रणजितसिंह नाईक निबाळकर यांनी कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलं नाही. दिगंबर आगवणे विरोधात निबाळकर यांनी एकही गुन्हा दाखल केलेला नाही. 2019 पासून कारखानाचा आणि रणजित निबाळकर यांचा काहीही संबंध नाहीये. पोलिसांनी 3 तक्रारी डॉक्टरच्या विरोधात केल्या आहेत. जर त्रास होत होता तर 3 वेळा बदलीची संधी असून फलटण का मागितल? सुषमा अंधारे यांनी मयत मुलीच्या घरी जाऊन सहानभूती दाखवायला हवी. रणजित निबाळकर यांची बदनामी करण्यासाठी सकाळी सुषमा अंधारे आणि जयश्री अगवाने पत्रकार परिषद घेतलीय. असेही वकील धीरज घाडगे म्हणाले.
आणखी वाचा