सातारा : राजकीय नेत्यांबद्दल अनेक कार्यकर्त्यांना मोठं प्रेम असतं. त्यांच्या प्रेमाखातर कार्यकर्ते काहीही करायला तयार असतात. आज आपण अशाच आपल्या नेत्यावर प्रेम असणाऱ्या युवकाची माहिती पाहणार आहोत. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावचा युवक आशिष अनिल गायकवाडने कराड दक्षिणचे भाजप आमदार अतुल बाबा भोसले (BJP MLA Atul Baba Bhosale ) यांच्याबाबत अनोक प्रेम व्यक्त केलं आहे. आज अतुल भोसले यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त अनिल गायकवाड या तरुणाने दाढी आणि कटींग मोफत करुन आपल्या नेत्याबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

Continues below advertisement


गेल्या तीन वर्षांपासून मोफट दाढी कटींगचा उपक्रम सुरु


आशिष अनिल गायकवाड यांच्या संकल्पेतून गेली तीन वर्षांपासून संपूर्ण रेठरे बुद्रुक गावाला केशकर्तन आणि दाढी कटीग ही सेवा मोफत पुरवली जाते. स्वतःच्या पारंपरिक व्यवसायातून अनेक लोकांना प्रेरणा देण्यासाठी व डॉ. अतुल बाबा करत असलेल्या सामाजिक सेवांचा वारसा जपत, आपल्या पारंपरिक व्यवसायातून भोसले कुटुंबियांच्या प्रेमापोटी ही मोफत सेवा सर्वांना पुरवली जात असल्याची माहिती अनिल गायकवाडने दिली आहे.  डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकासाठी अखंडपणे शैक्षणिक, आरोग्य, कृषी आणि वित्तीय संस्थांच्या माध्यमातून सेवा सुरु आहे. या सेवेप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम सुरु असल्याचे अनिल गायकवाडने सांगितले.




140 जणांनी केली मोफत दाढी कटींग 


दरम्यान, अनिल गायकवाड यांच्या दुकानात कटींग दाढीसाठी तीन खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. आज आमदार अतुल भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कटींग दाढी ठेवल्यामुळं जवळपास 140 जणांनी दाढी आणि कटींग केली असल्याची माहिती अनिल गायकवाड यांनी दिली आहे. अनिल गायकवाड यांनी त्यांच्या कटींगच्या दुकानाबाहेर मोफट दाढी कटींग करण्याचा बोर्डच लावला आहे.




माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करुन अतुल भोसले विजयी 


महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना देखील विधानसभा निवडणुकीत अपयश आलं आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अतुल भोसले (Atul Bhosale) यांना  तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना तिकीट देण्यात आले होते. या निवडणुकीत अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. अतुल भोसले यांनी यापूर्वी दोन वेळेस पृथ्वीराज चव्हाण यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 


महत्वाच्या बातम्या:


Atul Bhosale Profile : सलग 3 पराभवानंतर चौथ्या निवडणुकीत विधानसभेत एन्ट्री, पृथ्वीराज चव्हाण यांना पराभवाची धूळ चारणारे अतुल भोसले कोण आहेत?