Satara : साताऱ्यातील संगम माहुली येथे महाराणी ताराबाई यांच्या समाधीची दुरावस्थेबाबत ABP माझा वर बातमी प्रसिद्ध झाली होती. यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी देखील पत्र लिहून मुख्यमंत्र्यांकडे या समाधीबाबत जीर्णोद्धार करावा अशी मागणी केली होती. यानंतर पुण्यातील श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गौरव घोडे यांनी पुढाकार घेत या समाधीच्या सापडलेल्या अवशेषाला वज्रलेप केला आहे. यामुळे जीर्ण होणारी समाधी सुरक्षित झाली आहे.

 महाराणी ताराबाई यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी

दरम्यान, याबाबत प्रशासनाने आता ज्या जागी समाधी होती त्या ठिकाणी लवकरात लवकर काम सुरु करुन याचा जिर्णोद्धार करावा अशी मागणी होत आहे. उपेक्षित असलेली महाराणी ताराराणी यांच्या समाधीला सामाजिक संस्थांकडून वज्रलेप करण्यात आला आहे. लवकरात लवकर महाराणी ताराराणी यांच्या समाधीचा जीर्णोद्धार करावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला प्रशासन गांधारीच्या भूमिकेत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

कुत्र्याची समाधी म्हणजे शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न; इंद्रजीत सावंतांनी उलगडला रायगडाचा इतिहास