Sacred Games 2 : 'नींद का बलिदान देना होगा', सोशल मिडीयावर मीम्सचा धुमाकुळ
एबीपी माझा वेब टीम | 14 Aug 2019 09:29 PM (IST)
अनेकांनी आज रात्री 12 वाजता हे एपिसोड पाहणार असल्याच्या पोस्ट देखील सोशल मिडीयावर केल्या आहेत. चाहत्यांच्या या प्रतिसादाला नेटफ्लिक्सने देखील दाद दिली आहे.
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय Sacred Games या वेबसिरीजचा दुसरा सीजन आज रात्री 12 वाजता प्रदर्शित होणार आहे. सेक्रेड गेम्सचा पहिला सिजन गेल्या वर्षी प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हापासून दुसऱ्या सिजनची अनेकजण वाट पाहत आहेत. ही प्रतिक्षा आता संपलेली असून आज रात्री 12 वाजता दुसऱ्या सिजनचे सर्व एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात येणार आहेत. 15 ऑगस्टला Sacred Games Season 2 प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्सकडून देण्यात आली होती. दुसऱ्या सिजनचा ट्रेलर देखील प्रदर्शित करण्यात आला आहे. तेव्हापासून या सिरीजचे चाहते असलेले अनेकजण हे एपिसोड येण्याची वाट पाहत आहेत. सोशल मिडीयावरही सेक्रेड गेम्सचा बोलबाला पाहायला मिळत आहे. अनेकांनी आज रात्री 12 वाजता हे एपिसोड पाहणार असल्याच्या पोस्ट देखील सोशल मिडीयावर केल्या आहेत. चाहत्यांच्या या प्रतिसादाला नेटफ्लिक्सने देखील दाद दिली आहे. दुसऱ्या सिजनच्या ट्रेलरमधील लोकप्रिय 'बलिदान देना होगा' या डायलॉग नेटफ्लिक्सने ट्विट केला आहे. ट्विटरवरही सेक्रेड गेम्सबाबतचे अनेक मीम्स सध्या शेअर केले जात आहेत.