Santosh Deshmukh Murder Case Sudarshan Ghule: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील (Santosh Deshmukh Murder Case) मुख्य आरोपी सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याला 31 जानेवारीपर्यंत एसआयटी पोलीस सुनावण्यात आली आहे. सुदर्शन घुले याची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी एसआयटीकडून बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी झाली. सुदर्शन घुलेच्या मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभागकडून रिकव्हर करण्यात आला आहे. त्यानूसार पुढे तपास करायचा आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. यानंतर न्यायालयाने सुदर्शन घुलेला 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सुदर्शन घुलेला खालील मुद्द्यांवर 4 दिवसांची मिळाली पोलीस कोठडी-
- सदर आरोपीचा मोबाईलमधील डाटा हा फॉरेन्सीक विभाग, छत्रपती संभाजीनगर येथून रिकव्हर करण्यात आलेला असून त्या अनुषंगाने आरोपीकडे तपास करणे अत्यंत गरजेचे आहे.
- सदर आरोपीचे जप्त केलेल्या 02 मोबाईल पैकी एक मोबाईलचे लॉक ओपन झालेले नसून आरोपीकडुन मोबाईल लॉक ओपन करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- सदर आरोपी हा पोलीस कस्टडी रिमांडमध्ये असतांना तपासामध्ये कोणत्याही प्रकारचे सहकार्य केलेले नाही. त्यामुळे सदर आरोपीस अधिक विश्वासात घेऊन तपास करणे बाकी आहे.
- सदर आरोपीवर एकुण 09 गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यातील आरोपींनी एकत्रितरित्या बरेच गुन्हे केलेले असल्याने दाखल गुन्हा व संबंधीत गुन्हे याबाबत तपास करणे आहे.
- सदर गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम- 1999 चे कलम 3(1)(i), 3(1)(ii),3(2),3(4) अन्वये कलमवाढ करण्यात आलेली असुन सदर गुन्ह्यामध्ये आरोपी सुदर्शन घुले हा टोळीप्रमुख म्हणून काम करत असल्याने त्याचेकडे विचारपूस करणे आहे.
- सदर आरोपी हा टोळीप्रमुख असल्याने त्याचे सांगणेप्रमाणे इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न होत असल्याने सखोल तपास करणे बाकी आहे.
कोण आहे सुदर्शन घुले?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शन घुलेचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.