Anjali Damania On Doctor Ashok Thorat: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात (Doctor Ashok Thorat) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान मस्सोजागचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अशोक थोरात यांनी दिला होता. 


बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या संदर्भात अंजली दमानिया यांनी एक्सवर पोस्ट केली. हॉटेल पियुष इन हे अंबाजोगाई येथील हॉटेल कोणाचे आहे? याची चौकशी व्हायला हवी. अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी केली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात पूर्वी नाशिकला होते. त्यानंतर परत बड्या व्यक्तीच्या आशीर्वादामुळे त्यांची बदली बीडला झाली.


कोण आहेत डॉक्टर अशोक थोरात?


- डॉक्टर अशोक थोरात पूर्वी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांचे ओएसडी होते. मग बीडहून त्यांची नाशिकला बदली झाली. आता पुन्हा ते जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून बीडमध्ये रुजू आहेत.
- या पूर्वी देखील बीडमध्ये ते जिल्हा शल्य चिकित्सक होते.
- त्यानंतर त्यांची बदली नाशिकला झाली.
- नाशिक नंतर ते पुन्हा बीडला आले असून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत.
- अंजली दमानिया यांनी आरोप केल्यानंतर अंबाजोगाई येथील पियुष इन हॉटेल चर्चेत आलं
- पियुष इन हॉटेल हे थोरात कुटुंबियांच्या मालकीचे आहे.


डॉक्टर अशोक थोरात रीतसर रजेवर-


21 ते 31 तारखेपर्यंत डॉक्टर अशोक थोरात रीतसर रजेवर असून ते परदेशात आहेत. अशोक थोरात हे परदेशात असताना वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर अशोक थोरात रजेवर असताना हा पदभार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय राऊत त्यांच्याकडे होता आणि अशोक थोरात यांनीच यादरम्यान वाल्मिक कराड याच्यावर उपचार केले होते.


अंजली दमानिया यांची पोस्ट-






संबंधित बातमी:


देशमुखांचं पोस्टमॉर्टम केलं, अंबाजोगाईत पियुष हॉटेल, वाल्मिकसाठी नाशिकहून बीडला आणलं? अंजली दमानियांनी सिव्हिल सर्जनची कुंडली मांडली