नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या शेतकरी आंदोलनाला शिवसेनेचा देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेसार राज्यसभा खासदार संजय राऊत आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. ही माहिती संजय राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे.
संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुखदुःखात शेतकर्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. त्यांच्याच सूचनेवरून आज गाझीपुर सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जात आहोत.
या ट्वीटनंतर काही वेळातच दुसरे ट्वीट करत राऊत यांनी गाझीपूरच्या शेतकऱ्यांना दुपारी 1 वाजता भेटणार असल्याचे सांगितले. देशभरात शेतकरी आंदोलन सुरु असतानाच आता संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून 6 फेब्रुवारीला 'चक्का जाम' करण्याची घोषणा केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "सिंघू बॉर्डरवर पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अन्याय केला जातोय, त्यांच्यावर लाठीचार्ज आणि अश्रूधूराचा वापर करण्यात येतोय. आता केंद्र सरकारला बळाचा वापर करुन शेतकऱ्यांना उखडून टाकायचं आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत झालेला हिंसाचार हा पूर्वनियोजित कट होता. हे काम नक्कीच सरकारचं आहे, कारण भारतीय जनता पक्षाशी संबंधित एका गटाने हा हिंसाचार घडवल्याचं समोर आलंय."
संबंधित बातम्या :