दरम्यान, दोन्ही ठाकरे बंधु उद्या एकत्र मंचावर दिसणार आहे. या  विजयी मेळाव्याची रूपरेषा ठरली असून उद्याचा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असा असेल. मराठी माणसाच्या लढ्यात आणि विजयी मेळाव्यात येणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही स्वागत करू आणि येणाऱ्या प्रत्येकाचं योगदान यात आहे, असं देखील आम्ही मान्य करू. असेही संजय राऊत म्हणाले.

सर्व कार्यक्रमाचे रूपरेषा ठरलेली आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित भुरे करतील आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे ती रूपरेषा तुम्हाला आता सांगितले तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का यावा? त्यामुळे उद्या सर्व कळेल. जे येतील त्या सगळ्यांचे स्वागत आम्ही करू. मग ते काँग्रेस नेते असतील, राष्ट्रीय काँग्रेसचे नेते असो की डावेपक्ष असतील प्रत्येकाचा आम्ही सन्मानाने स्वागत करू आणि या लढाईत सर्वांचे योगदान आहे हे मान्य करू असेही संजय राऊत म्हणाले. 

कसे असणार नियोजन काही ठळक मुद्दे: 

सर्वप्रथम दोन्ही ठाकरेंचे पक्ष आणि त्यांचे नेते आपआपला पक्षीय अहंकार (इगो) बाजूला ठेवून या मेळाव्यासाठी झोकून देऊन काम करतील असं ठरलं आहे.

सोशल मिडीया, बॅनर, जाहिरातींद्वारे या मेळाव्याची जोरदार प्रसिद्धी केली जाण्याची जबाबदारीही दोन्ही पक्षांच्या विशेष टीमकडे सोपवण्यात आली आहे.

बॅनरबाजी, पोस्टर, घोषणाबाजीतून एकमेकांना डिवचले जाणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना केल्या जाणार आहेत.

गर्दीचे नियोजन ही मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे. दोन्ही ठाकरेंच्या पक्षांमधील नेत्यांच्या विशेष टीम तयार करुन जबाबदारीचं वाटप केलं जाणार आहे.

मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधुंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची प्रत्येक गोष्टीची रंगीत तालीम शुक्रवारी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे.

व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष यांना स्थान दिले जाणार आहे. इतर सर्व नेते खाली व्यासपीठासमोर बसणार आहेत.

दोन्ही ठाकरे बंधू आणि इतर सहकारी पक्षांचे अध्यक्ष / प्रदेशाध्यक्ष आले तरी मोजक्याच नेत्यांची भाषण होतील.

आदित्य ठाकरे, अमित ठाकरे हे देखील व्यासपीठाच्या खालीच असणार आहेत. सर्व नेत्यांचा सन्मान जपला जाईल अशी आसनव्यवस्था असणार आहे.

मेळाव्याचा केंद्रबिंदु मात्र ठाकरे बंधुच राहणार आहेत. जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत. विजयी मेळाव्याचं थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येणार आहे.

वरळी डोममध्ये गर्दी झाल्यास डोमच्या गॅलरीही कार्यकर्त्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. वरळी डोम परिसरात मोकळ्या जागेत अतिरिक्त शेड टाकून बैठक व्यवस्था केली जाणार आहे.

हे ही वाचा