Sangli News : महाराष्ट्राला लाभलेला सहकार चळवळीचा वारसा गुलाबराव पाटील यांनी समर्थपणे पेलला, त्याकाळी सहकार क्षेत्राला चांगले दिवस आणले. संपूर्ण महाराष्ट्राचे सहकार चळवळ कशी शक्तिमान होईल हे गुलाबराव पाटील यांनी काम करत असताना कटाक्षाने पाळलं, पण सहकार क्षेत्रामध्ये अनेकावर टीका होतात. मात्र, गुलाबराव पाटील असे व्यक्तिमत्व होतं त्यांच्यावर सहकार क्षेत्रात असूनही काळा डाग कधी लागला नाही असे मत शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. 


सहकारातील अर्थकारणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे


सहकारतीर्थ गुलाबराव पाटील जन्मशताब्दी समिती आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Sangli News) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील तरुण भारत स्टेडियममध्ये हा सोहळा संपन्न झाला. यावेळी बोलताना शरद पवारांनी राज्यातील सहकार चळवळी बद्दल चिंता व्यक्त केली. एकेकाळी महाराष्ट्रामध्ये शंभर ते सव्वाशे साखर कारखाने उभारले गेले, आता तेवढीच संख्या खासगी साखर कारखान्यांची झाली आहे. याचा अर्थ आहे, की सहकाराच्या बाहेर जाऊन खासगी कारखाने उभे करण्याचा आग्रह समाजातील लोक घेत आहेत आणि त्याचा परिणाम आता दिसत आहे, पण सहकारातील अर्थकारणाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले. 


सहकाराच्या रस्त्यावरून पुढे जायचं असेल तर गुलाबराव पाटील, वसंतदादा पाटील आणि राजरामबापू पाटील यांनी ज्या पद्धतीने सहकारी संस्था वाढवल्या, टिकवल्या,तो रस्ता आपण पाहिजे धरला तर सहकारी चळवळ टिकेल, अन्यथा खासगी संस्थांना कोणी आवर घालू शकत नाही, अशी भीती वजा सल्ला शरद पवारांनी दिला. 


अन्यथा खासगी संस्थांना कोणी आवर घालू शकणार नाही


महाराष्ट्रातील सहकारी चळवळीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली. सहकार चळवळ टिकायची असेल, तर जुन्या नेत्यांचा रस्ता धरला पाहिजे, अन्यथा खासगी संस्थांना कोणी आवर घालू शकणार नाही असे पवार म्हणाले. सांगलीत आज स्व. गुलाबराव पाटील जन्मशताब्दी सांगता सोहळा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी भाषणात शरद पवार यांनी गुलाबराव यांच्या सहकार क्षेत्रातील कार्याची आठवण आणि त्याला उजाळा दिला. आज सहकारी चळवळीमध्ये पहिल्यासारखे दिवस राहिले आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही. हल्लीच्या काळामध्ये सहकार्याने संस्थांची संख्या कमी होते आणि याच क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्र सहभागी होते असेही पवर म्हणाले.


सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता सोहळा सांगलीत मोठ्या दिमाखात पार पडला. सांगता कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के.पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, कामागर मंत्री सुरेश खाडे, माजी मंत्री विश्वजित कदम आदी मान्यवर उपस्थित होते. 


गुलाबराव पाटील चौक नामकरण आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण


सांगली शहरातील मार्केट यार्ड समोरील सहकारतीर्थ गुलाबराव पाटील चौक नामकरण आणि सुशोभीकरणाचे लोकार्पण शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न  झाला. यानंतर सहकारतीर्थ गुलाबराव पाटील यांच्या जीवनावरील 'सहकारतीर्थ' या जीवन चरित्राचे मुख्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन  झाले. तसेच माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल आणि बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांना बँकिंग क्षेत्रातील कामगिरीबद्दल प्रदान करण्यात आला. तसेच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील पुरस्कार तसेच सहकारतीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार माजी आमदार प्रा. शरद पाटील आणि सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके यांनाही प्रदान करण्यात आला. 


कोण आहेत गुलाबराव पाटील?


गुलाबराव पाटील हे जिल्हा बँकेचे शिल्पकार आहेत. तीस वर्षे त्यांनी या बँकेसाठी अध्यक्ष व संचालक म्हणून काम केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या तसेच अन्य संस्थांसाठी त्यांनी खूप काही काम केले आहे. त्यांचे हे योगदान लक्षात घेऊन त्यांना जन्मशताब्दी वर्षात आदरांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम घेण्याचा निर्णय संचालक मंडळाने एकमताने घेतला होता. बँकेच्या आवारात गुलाबराव पाटील यांचा यापूर्वीच पुतळा उभा करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या