सांगली : सांगलीमध्ये (Sangli Loksabha) सर्वांना बदल हवा असून तो बदल हवा असेल, तर एकास एक लढत व्हावी, अशी सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांची मागणी असून विद्यमान खासदारांबद्दल खदखद असल्याचे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Sangli Loksabha) तीन दिवस सांगली दौऱ्यावर असून आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी विश्वजीत कदम आणि काँग्रेसकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या विशाल पाटील यांना यांना खोचक शब्दात टोला लगावला.


भिवंडीची जागा पण काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर


संजय राऊत यावेळी बोलताना म्हणाले की भाजपच्या देखील नेत्यांमध्ये विद्यमान खासदारांबद्दल नाराजी आहे. दरम्यान शरद पवार यांनी काल पुण्यामध्ये बोलताना मित्रपक्षाने सांगलीची जागा परस्पर जाहीर केल्याचे वक्तव्य केले होते. या संदर्भात त्यांना विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी पवारांचे वक्तव्यावर मला काही बोलायचं नसल्याचे म्हणाले. भिवंडीची जागा पण काँग्रेसला विश्वासात न घेता जाहीर केल्याचे ते म्हणाले. मात्र, ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसच जिंकेल असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला. 


ते पायलेट नेईल तिकडे जात आहेत


दरम्यान, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी सांगलीच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला असल्याने संजय राऊत यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला. ते म्हणाले की, त्यांचे पायलट कोणीतरी आहेत. ते पायलेट नेईल तिकडे जात आहेत. आता ते विमान गुजरातला उतरू शकते, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी यावेळी लगावला. 


नरेंद्र मोदींचा पराभव होईल, फडणवीस अंधारात चाचपडत आहेत 


वसूली रॅकेटवरुनही संजय राऊत यांनी भाजपवर तोफ डागली. ते म्हणाले की, ते म्हणाले की भाजपलाच वसूली रॅकेटची गरज असून त्यातून 8 हजार कोटी गोळा केले आहेत. त्यामुळे आमच्यातील काही लोक भाजपामध्ये गेल्याचे ते म्हणाले. देशभरातील वसुली रॅकेटवालेही भाजपमध्ये गेले आहेत, त्यामुळे भाजपचे आभार मानले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार असा सामना असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव होईल, फडणवीस कोणत्यातरी अंधारात चाचपडत असल्याचे म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या