सांगली : काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगली लोकसभेची (Sangli Loksabha) जागा काँग्रेसला न सुटल्याने काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विरोधामध्ये बंडखोरी केली आहे. त्यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये अपक्ष आणि काँग्रेसकडून असे दोन उमेदवारी अर्ज विशाल पाटील यांनी दाखल केले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला जाणार की विशाल पाटील रिंगणातून माघार घेणार? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. सांगलीमध्ये आज (19 एप्रिल) महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
संपत्तीमध्ये 8 कोटी 80 लाख 84 हजार 799 रुपयांची वाढ
त्यामुळे काँग्रेस काय निर्णय घेणार? याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. दरम्यान विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. विशाल पाटील यांची (Vishal Patil Net Worth) एकूण संपत्ती 30 कोटी 52 लाख 41 हजार 735 रुपयांची आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये विशाल पाटील यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 8 कोटी 80 लाख 84 हजार 799 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 8 कोटी 80 लाख 84 हजार 799 रुपयांनी संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार विशाल पाटील यांच्या नावावर 26 कोटी 74 लाख 93 हजार 39 रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या पत्नी पूजा पाटील यांचे नावे 3 कोटी 77 लाख 48 हजार 696 रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. विशाल पाटील यांच्याकडे 10 कोटी 59 लाख 13 हजार 834 रुपयाची जंगम मालमत्ता आहे, तर 16 कोटी 15 लाख 19 हजार 205 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
विशाल पाटलांच्या कर्जाचा भार कमी झाला
पत्नी पूजा यांच्या नावे 3 कोटी 3 लाख 73 हजार 307 रुपये जंगम मामाता आहे, तर 73 लाख 7 5 हजार 389 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार होते. दरम्यान, विशाल पाटील यांच्या नावे 2019 मध्ये 10 कोटी 30 लाख 62 हजार 594 रुपयांचे कर्ज होते. त्या कर्जाचा आता भार कमी झाला असून सध्या 7 कोटी 65 लाख 2 हजार 560 रुपयांचं कर्ज आहे. पत्नीच्या नावे 61 लाख 76 हजार 989 रुपयाचे कर्ज आहे, तर पाच वर्षात दोन कोटी 65 लाखाने कर्जाचा भार कमी झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या