मिरज (जि. सांगली) : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरज तालुक्यातील (Miraj) बेडग रस्त्यावर दुचाकी आडवी आल्याने पोलिसांची (Sangli Police) निर्भया पथकाची गाडी पलटी झाली. या अपघातात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. दुचाकीस्वार या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात बोलेरो पलटी
आडव्या आलेल्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात मिरज पोलिसाची बोलेरो पलटी झाली. बेडग गावातील शाळांची तपासणी करून निर्भया पथक मिरजेकडे परत येत असताना हा अपघात झाला. दुचाकीस्वार आडवा आल्याने या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात पोलिस वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि पलटी झाले. बेडग ते आडवा रस्ता दरम्यान हा अपघात झाला. बोलेरो वाहनातील तीन पोलीस किरकोळ जखमी झाले.
मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय
निर्भया पथकातील एएसआय संभाजी धेंडे, अजित कोळेकर, इरवंत येमलवाड अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. महादेव रायप्पा निवलगी (रा. मदभावी, कर्नाटक) असे दुचाकीस्वार वाहनचालकाचे नाव असून तो गंभीर जखमी झाला आहे. मिरज शासकीय रुग्णालयात त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघात ठिकाणी दुचाकीजवळ दारूच्या बाटल्या आढळल्या. मद्यप्राशन करून दुचाकीस्वार वाहन चालवत असल्याने अपघाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
भरधाव वेगात दुचाकीला चिरडत एसटी झाडावर आदळली
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील (Satara ST Accident) वडूज-खटाव रोडवर जाधव वस्तीजवळ भरधाव वेगात मोटरसायकलला चिरडत एसटी (Satara accident ST bus crushed a two wheeler at high speed) झाडावर आदळली. काल रविवारी (8 ऑक्टोबर) रोजी हा अपघात घडला. या भीषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. एसटी चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडला. एसटी बस झाडावर आदळल्याने एसटीतील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या