सांगली : भाड्याने घेतलेली खोली बदलण्याच्या कारणातून झालेल्या वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात खोरे घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना विटा शहरामध्ये घडली. सलमा गुराप्पा ईकूरोट्टी असे मयत महिलेचे नाव आहे. या खून प्रकरणी महिलेचा पती गुराप्पा शंकराप्पा ईकूरोट्टी याला विटा पोलिसांनी अटक केली. 

दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणातून वारंवार वाद

ईकूरोट्टी हे दाम्पत्य मूळचे कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यातील शोरपुरा या गावातील असून ते सध्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथे भाड्याने घेतलेल्या खोलीत वास्तव्यास होते. दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. ईकूरोट्टी दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणातून वारंवार वाद होत होता. 

डोक्यात वर्मी घाव बसल्याने जागीच मृत्यू

बुधवारी रात्री देखील दोघांमध्ये सध्या वास्तव्यास असलेली भाड्याची खोली बदलण्याच्या कारणातून वाद झाला. यावेळी पती गुराप्पा ईकूरोट्टी याने पत्नी सलमा ईकूरोट्टीच्या डोक्यात खोरे घालून गंभीर जखमी केले. डोक्यात वर्मी घाव बसल्याने सलमा हिचा जागीच मृत्यू झाला. सलमा हिच्या खून प्रकरणी विटा पोलिसांनी गुराप्पा ईकूरोट्टीला अटक केली.

इतर महत्वाच्या बातम्या