सांगली : विश्वास संपादन करून द्राक्ष विक्रेत्या एजंटाची गुजरातमधील व्यापाऱ्यांनी 56 लाख 67 हजार 920 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक झाल्यानंतर एजंट मारुती नामदेव टेंगले यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुजरातमधील व्यापारी शाजाद शेख (अहमदाबाद ) आणि दिवाणजी अहमद खान (आनंद, गुजरात) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
25 लाखांचे पाच धनादेश देऊन विश्वास संपादन
तक्रारदार मारुती टेंगले यांचा पेठभाग परिसरातील जामवाडीत अंजली फ्रुट सेंटर अँड सप्लायर्स हा व्यवसाय आहे. गुजरातमधील ए-1 कंपनीचा मालक संशयित शाजाद शेखशी त्यांची ओळख झाली. शेख आणि त्याच्या दिवाणजीने रोख रक्कम देऊन टेंगलेंकडून मोठ्या प्रमाणात द्राक्ष खरेदी केली होती. त्यानंतर टेंगले यांना 'मोठी रकम रोखीने देणे अवघड झाल्याचे असे सांगून सुरक्षिततेसाठी 25 लाखांचे पाच धनादेश देऊन विश्वास संपादन केला.
टेंगलेंच्या अंजली फ्रुट अँड सप्लायर्समधून मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांची 1 कोटी 78 लाख 81 हजार 582 रुपयांची 550 टन द्राक्ष खरेदी करून गुजरातला नेली. खरेदी केलेल्या मालापैकी 1 कोटी 24 लाख 13 हजार 665 रुपये टेंगलेंना दिले. त्यानंतर उर्वरित 54 लाख 67 हजार 920 रुपयांच्या मालाचे आणि कामगारांच्या मजुरीचे दोन लाख रुपये अशा 56 लाख 67 हजार ९२० रुपयांसाठी टेंगलेंनी तगादा लावला होता. दोघेही पैसे टाळाटाळ करू लागले.
त्यामुळे फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच टेंगलेंनी सांगली शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फसवणुकीची घटना ही 1 फेब्रुवारी 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत पेठभागात घडली आहे. टेंगलेंच्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयित व्यापाऱ्यांसह दिवाणजीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सांगलीत व्यावसायिकाची 41 लाखांची फसवणूक
दरम्यान, जादा परताव्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील (Sangli News) कवठेमहांकाळ तालुक्यात उघडकीस आली होती. कोगनोळी येथील एका व्यावसायिकाची 41 लाख 5 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप तुकाराम नवगिरे (रा. पिपळखुंटे, ता. माढा, जि. सोलापूर ) आणि पावबा रमण कोळी (रा. सह्याद्रीनगर, विश्रामबाग, सांगली ) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत सांगली शहर पोलिस ठाण्यात जुन्या वाहनांची खरेदी विक्री करणारे व्यावसायिक सचिन तमन्ना रामगोंडावरु यांनी फिर्याद दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या