सांगली : पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही, विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून विधानसभा (Tasgaon Vidhan Sabha) जिंकायची असल्याचे सांगत सांगली लोकसभेतील पराभवानंतर माजी खासदार संजयकाका पाटील (Sanjay Patil) विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत. शिकार करायची असेल तर दोन पावले मागे यावे लागते, असेही संजयकाका म्हणाले. तथापि, संजय पाटील यांनी स्वतः विधानसभा लढवणार की मुलगा प्रभाकर यांना निवडणुकीत उतरवणार? हे मात्र अद्याप जाहीर केलेलं नाही. 


संजय पाटील म्हणाले की, सांगली लोकसभा निवडणुकीत विकासाच्या मुद्यापेक्षा जातीपातीच्या राजकारणामुळे माझी अडचण निर्माण झाली, पण या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. दोन महिन्यावर असलेल्या विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करून आपणाला विधानसभा जिंकायची आहे, असे आवाहन माजी खासदार संजय पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.


तासगाव विधानसभा ताकदीने लढणार


तासगावमध्ये आयोजित प्रभोदय दहीहंडीच्या संजयकाका पाटील (Sanjay Patil on Tasgaon Vidhan Sabha) बोलत होते. सांगली लोकसभेतील पराभवानंतर संजयकाका पाटील यांनी तासगाव विधानसभा ताकदीने लढवण्याचे सांगितले असले, तरी नेमके विधानसभा ते स्वतः लढवणार की मुलगा प्रभाकरला निवडणुकीत उतरवणार हे मात्र संजयकाकांनी अद्याप स्पष्ट केलेलं नाही. त्यामुळे तासगावमधून (Tasgaon-Kavathe Mahankal Assembly constituency) यंदा आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील निवडणूक लढवणार असल्याची जवळपास निश्चित असताना आता संजयकाकांनी तयारी सुरु केली आहे. 


जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली


काहींना केवळ मोठे बोलण्याची सवय आहे. हातभर लाकूड आणि दहा हात ढांपी असं सुरू आहे असे म्हणत संजयकाका पाटील यांनी आर. आर. पाटील यांच्या कुटुंबावर टीका केली. आपण जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांची कामे केली. पाणी, रस्ता, रेल्वेचे प्रश्न सोडवले. अनेक रखडलेल्या योजना पूर्णत्वास नेल्या. लोकांनी आशीर्वाद दिले म्हणून हे सर्व करता आले. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा ताकतीने आपणास विधानसभा निवडणूक लढायची आहे. त्यामुळे दोन महिने ताकदीने काम करूया. तालुक्यात विकासाचे पर्व पुन्हा नव्या पिढीच्या हातात देऊया. गतिमान विकास करूया, प्रभाकर पाटील तुमच्यासाठी काम करत आहे असे संजयकाका पाटील यांनी म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या