Sakshna Salgar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच राजीनामा घेण्यासाठी आंदोलन करायला सांगितले होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते. अजित पवारांच्या या दाव्याला सक्षणा सलगर यांनी प्रत्युत्तर दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्याच्या नादात सक्षणा सलगर यांनी वेगळ्याच मुद्याला हात घातलाय. कोणीतरी सांगितले की, शरद पवार यांनीच राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आंदोलन करा, पण आम्हाला कोणी सांगितले नव्हते. शरद पवार हे आमचे नेते आहेत. आम्ही त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपू. आमच्या देशाचे ते बाहुबली आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या (शरद पवार गट) सक्षणा सलगर  म्हणाल्या आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील सराटी येथे शेतकरी मेळावा पार पडला होता. या वेळी त्या बोलत होत्या. 


अमोल मिटकरींवर बोचरी टीका 


सक्षणा सलगर यांनी यावेळी अमोल मिटकरींवर जोरदार टीका केली. सध्या तळ्यात मळ्यात कोण कोणाच्या गळ्यात अशी परिस्थिती आहे. आम्ही बाजारु विचारवंत नाही, अशी टीका सक्षणा सलगर यांनी केली आहे. सुप्रिया सुळेंच्या उपस्थित झालेल्या मेळाव्यात सलगर यांनी अजित पवार गटावर टीकास्त्र सोडले आहे. शरद पवार काय आहेत? हे लातूरच्या लोकांना विचारा, असे आव्हानही सलगर यांनी अजित पवार गटाला दिले. लोक म्हणतात 1 रुपयांचा कडीपत्ता सोलापूरचा खासदार बेपत्ता' असे म्हणत सलगर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सक्षणा सलगर यांच्या टीकेला अमोल मिटकरी काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. 


बचतगट चालवणारी बाई प्रदेशाध्यक्ष : सक्षणा सलगर 


बचतट चालवणारी बाई प्रदेशाध्यक्ष झाली, अशी टीका सक्षणा सलगर यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर नाव न घेता केली आहे. 2019 मध्ये सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची जबाबदारी द्या, असे मी शरद पवारांना म्हणाले होते. 100 गद्दारांची गर्दी असण्यापेक्षा काही दर्दी असलेले बरे असतात. आमचा बाहुबली आम्ही रिटायर होऊ देणार नाही, असेही सलगर यांनी स्पष्ट केले. अजित पवार- अमोल कोल्हे यांच्या वादात आता सक्षणा सलगर यांनी उडी घेतली आहे. अमोल कोल्हेंच्या विरोधात कोणाला पण उमेदवारी देऊ नका, पात्र उमेदवार शोधा असे म्हणत सलगर यांनी अजित पवारांच आव्हान दिले आहे. 


Sakshana Salgar Speech Video सक्षणा सलगर यांचे संपूर्ण भाषण 



 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी! राज ठाकरे सहाव्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला; 'या' मुद्यांवर चर्चा