Sachin Tendulkar and Ram Mandir : राम मंदिराचे (Ram Mandir) 22 जानेवारी रोजी उद्घाटन होणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपकडून (BJP) जोरदार तयारी सुरु आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेकांनी निमंत्रित करण्यात येते. आता भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरलाही (Sachin Tendulkar) राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारीच्या या कार्यक्रमासाठी देशभरातून राम भक्त येणार असल्याचे म्हटले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार, सचिन तेंडुलकरला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मास्टर ब्लास्टरची धर्माबाबत असलेली आस्था सर्वश्रूत आहे. सचिन दरवर्षी गणेशोत्सवही उत्साहात साजरा करत असतो. कुटुंबासमवेत पुजा करतानाही तो अनेकदा दिसला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते 22 जानेवारी रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी अनेक दिग्गज अयोध्येत उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातच आता अजित पवार यांना देखील राम मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आलंय. राम मंदिराच्या उद्घाटनाकरता महाराष्ट्रातून सात पक्षप्रमुखांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
महाराष्ट्रातून निमंत्रित करण्यात आलेल्या नेत्यांची यादी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)
रिपाई खासदार रामदास आठवले (Ramdas Athwale)
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)
राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)
कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण
महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
राम मंदिरामुळं धार्मिक पर्यटनात वाढ, धार्मिक स्थळे शोधणाऱ्यांची संख्येत 97 टक्क्यांची वाढ