भिवंडी : देश आज मोठी प्रगती करून सर्व क्षेत्रात पुढे जात आहे. जगभरात त्याची प्रतिष्ठा वाढत असून अर्थकारणातली शक्ती वाढत आहे. मात्र आज जो आदर सत्कार आणि लौकिक आपल्याला मिळत आहे तो कुणामुळे आहे? जर उदाहरण द्यायचं असेल तर  ईथे 27 हजार विद्यार्थी ते ही सर्व वर्गातले ईथे उत्तम शिक्षण घेत आहे. ते कुणामुळे तर त्याचं उत्तर हे आहेत की पद्मश्री अण्णासाहेब जाधव यांनी मोठ्या त्यागातून हे विद्यालय उभे केले आहे. हे परिश्रम त्यांनी स्वतःसाठी नाही तर राष्ट्रासाठी केले आहे. आपल्या देशाला अजून पुढे जायचं आहे. त्यासाठी संपूर्ण विश्व याची वाट पाहत आहे की भारताकडून आपल्याला पुढचा मार्ग मिळेल. 

किंबहुना असा भारत बनविण्याचे स्वप्न आणि दायित्व आपल्या साऱ्याचे आहे. आपण आज आनंदात सोहळा साजरा करतोय कारण यापूर्वी अनेकांनी आपल्या आयुष्याचे समर्पण करत त्याग केला आहे. आपल्या देशाचे दायित्व इथल्या जण गण मण आणि लोकतंत्रावर आहे. ही कोण्या एकाची जबाबदारी नसल्याचे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी मार्गदर्शन केलंय. भिवंडीतील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय येथे देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

सार्वभौम राष्ट्राचे प्रतीक असलेला आणि आपला राष्ट्रीय ध्वज असलेला तिरंगा हा मोठ्या विचारपूर्वक  पद्धतीने बनविण्यात आला आहे. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. तीन रंगाचा ध्वज आणि त्यात धम्मचक्र असं  या ध्वजात असून वर च्या बाजूस त्याग आणि कर्माचा रंग आहे. भक्ती, त्याग आणि कर्माच्या त्रिवेणीचं प्रतीक असलेल्या केसरिया आहे. समर्पनाचा रंग पांढरा आहे. तर समृद्धीचा रंग हिरवा आहे.असेही सरसंघचालक म्हणले.

परंपरा जपत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म- मोहन भागवत

देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त आणि फक्त देशातील सजक नागरिकांमुळे शक्य होत आहे. या संस्थेचे संस्थापक अण्णासाहेब जाधव यांनी त्यागपूर्वक समाजासाठी कार्य केले. देशासाठी अनेकांनी त्याग केलाय. त्यामुळे आज आपण आपली कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव ठेवली पाहिजे. प्रत्येकाने आपापल्या परंपरा याची जपणूक करीत बंधुभावाने जगणे हाच खरा धर्म आहे. समाजाचे सहयोग घेऊन समाजासाठी कार्य करणे हाच खरा धर्म आहे. देश पुढे जात असताना येथील भारतीयांची प्रतिष्ठा वाढली आहे. कोण किती कमावतो त्यापेक्षा समाजासाठी किती वाटतो, त्यावर माणसाची प्रतिष्ठा ओळखली जाते. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक प्रगतीत यश मिळवून त्याचा विभाग समाजासाठी करावा, अशा शुभेच्छा ही सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी दिल्या.

इतर महत्वाच्या बातम्या