Nita Ambani मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 48व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (Annual General Meeting) रिलायन्स फाउंडेशनच्या (Reliance Foundation) संस्थापक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आरोग्य सेवा प्रकल्पाची मोठी घोषणा केली. या अंतर्गत, रिलायन्स फाउंडेशन मुंबईच्या मध्यभागी 2000 बेड्स असलेले एक आधुनिक वैद्यकीय शहर बांधत आहे. नीता अंबानी म्हणाल्या की, फाउंडेशनच्या ग्रामीण विकास उपक्रमांमुळे या वर्षी 55,000 हून अधिक गावांमधील 15 लाख लोकांचे जीवन सुधारले आहे.

Continues below advertisement


ग्रामीण विकास, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या क्षेत्रात रिलायन्स फाउंडेशनचे उपक्रम देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहेत, असे नीता अंबानी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या कि, "हे फक्त एक रुग्णालय राहणार नाही, तर भारतातील आरोग्यसेवेच्या नवोपक्रमाचे एक नवीन केंद्र बनेल. येथे एआयच्या मदतीने निदान केले जाईल. प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान, भारत आणि जगातील सर्वोत्तम डॉक्टर एकत्रितपणे येथे उपचारांच्या उच्च दर्जाची पूर्तता करतील." भविष्यातील डॉक्टर तयार करता यावेत यासाठी येथे एक वैद्यकीय महाविद्यालय देखील बांधले जाईल, असेही त्या म्हणाल्या.


मुलांच्या कर्करोगाच्या उपचारांवर विशेष लक्ष


गेल्या दशकात मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलने 33 लाख रुग्णांवर उपचार केले आहेत आणि त्याला भारतातील आघाडीच्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलचा दर्जा देण्यात आला आहे. रुग्णालय आता आपले काम वाढवत आहे आणि जीवन नावाची एक नवीन शाखा सुरू करत आहे. हे विशेषतः केमोथेरपी आणि इम्युनोथेरपीसाठी असेल, ज्यामध्ये मुलांच्या कर्करोगाच्या उपचारांवर (बालरोग ऑन्कोलॉजी) विशेष लक्ष दिले जाईल. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.




1 कोटींहून अधिक मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय- नीता अंबानी


आमचे ध्येय केवळ क्षमता वाढवणे नाही, तर जागतिक दर्जाची आरोग्यसेवा प्रत्येक भारतीयासाठी सुलभ आणि परवडणारी बनवणे आहे. रिलायन्स फाउंडेशनच्या ग्रामीण विकास उपक्रमांमुळे यावर्षी 55, 000 हून अधिक गावांमधील 15 लाख लोकांचे जीवनमान सुधारले आहे. यामध्ये जल सुरक्षा, शेती, मच्छीमार समुदायाचे सक्षमीकरण आणि महिला आणि मुलांना आधार देणे यांचा समावेश आहे. असेही नीता अंबानी यावेळी बोलताना म्हणाल्या.


"भारताच्या कानाकोपऱ्यात 1 कोटींहून अधिक मुलांना जागतिक दर्जाचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे. खेळांमध्ये जीवन बदलण्याची शक्ती आहे, यावर त्यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की, 'सर्वांसाठी शिक्षण आणि क्रीडा' कार्यक्रमाद्वारे, रिलायन्स फाउंडेशनने आतापर्यंत 2.3 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचले आहे.




इतर महत्वाच्या बातम्या