Bhaskar Jadhav : शिवसेनेचे फायरब्रिग्रेड नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर अलीकडे काही दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा विश्वास टाकून नेते पदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे. भास्कर जाधव यांची वकृत्व शैली नेहमीच राजकरणात आक्रमक असते. त्यामुळे त्यांच्यासमोर पक्षातील आमदारांनाही भास्कर जाधव मेळाव्यात काय बोलणार याची उत्सुकता लागलेली असते. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी राजकारणातील अनेक मुद्दे मांडले विशेषता करून भाजपविषयी चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले.  


आज शिवसेना ज्या अडचणीतून वाटचाल करतीये आणि त्या अडचणीतून वाटचाल करायची असेल, तर शेवटी आलेली प्रत्येक गोष्ट आलेलं प्रत्येक संकट आलेलं प्रत्येक आवाहन आणि या आव्हानाला पाठ करून चालणार नाही. तर त्या आव्हानाविरोधात निधड्या छातीने उभं राहावं लागेल.  भास्कर जाधव हे कुठल्याही संकटाला कुठल्याही आव्हानाला पाठ फिरवणार नाहीत. किंबहुना छातीचा कोट करून उभे राहतील, अशा प्रकारचा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझ्याविषयी व्यक्त केल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं. 


 चिपळूण मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार (आता बंडखोर) सदानंद चव्हाण यांच्या विषयी काय म्हणाले.. - 


दोन दिवसांपूर्वी चिपळूण मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी शिंदे गटातील उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सोबत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन शिंदे गटात प्रवेश केल्याने चिपळूणच्या राजकीय समिकरणे बदली आहेत. त्यामुळे गेलेल्या माजी आमदार चव्हाण यांच्या संदर्भात भास्कर जाधवांना प्रश्न विचारला असता..मोठ्या मिश्किलने याचे उत्तर दिले आहे.  उद्धव साहेबांनी मला आता राज्याचा नेता केलेला आहे, तिथला एखादा शाखाप्रमुख वगैरे त्या गोष्टीवर बोलेल.


सध्या याकुब मेमनच्या कबर सुशोभीकरणावरुन राजकीय वाद सुरु आहे, यावर भास्कर जाधव काय म्हणाले?


सध्या राजकरणात याकुब मेमनच्या समाधी सुशोभिकरणावरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राजकीय वाद चांगलाच रंगलाय. गेल्या आठवड्यात भास्कर जाधव यांनी गुहागरच्या शिवसेनेच्या मेळाव्यात भारतीय जनता पार्टी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जातीय दंगली घडवू शकते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे गुहागर मधील भाजप कार्यकर्तेनी पोलिस ठाण्यात या वक्तव्या संदर्भात गुन्हा नोंद व्हावा म्हणून तक्रारी अर्ज केला होता..आज त्याच उत्तर भास्कर जाधवांनी एबीपी माझाशी बोलताना दिले आहे. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काय घडवायचं हे काही दिवसापूर्वी मी सांगितलं आणि त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या काही विद्वानांनी आणि माझ्यावर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचं पत्र कालच दिलं. कालच राज्यामध्ये याकुबु मेमनच्या कबरीमध्ये जे काय सुशोभीकरण झालं याबद्दल संपूर्ण राज्यामध्ये त्यांनी जो काही हैदोस मांडलाय. काट्याचा नायटा करायचा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे कधी केला, असे जाधव म्हणाले.  


गणपतीचा उत्सव होत असताना या उत्सवामध्ये काही विघ्न निर्माण व्हावं असे भाजप करतंय.. -
गणपतीसारखा उत्सव आहे..गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणपतीचा उत्सव होऊ शकत नव्हता. अशा पार्श्वभूमीवर गणपतीचा उत्सव होतोय आणि गणपतीचा उत्सव होत असताना या उत्सवामध्ये काही विघ्न निर्माण व्हावं की काय अशा प्रकारची एखादी परिस्थिती निर्माण व्हावी अशा पद्धतीने नसलेलं खोटे आरोप करून भारतीय जनता पार्टी अनेक लोक बोललेत. मुळामध्ये याकुब मेमन याने देश विरोधात कृत्य केलं. बॉम्बस्फोटामध्ये तो आरोपी आहे अशा माणसाची बॉडी,अशा माणसाचं प्रेत त्याच्या नातेवाईकांची ताब्यात का दिलं.अमेरिकेने ओसामा बिन लादेनला मारलं, त्याचं प्रेत हे समुद्रामध्ये फेकून दिलं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये बुरान वाणी हा अतिरेकी मारला. पण त्याची बॉडी मात्र ताब्यात दिली आणि लाखो लोकांनी त्याची प्रेत यात्रा काढली. अशाच पद्धतीने 2015 साली याकुब मेमनला फाशी दिली गेली व त्याची बॉडी ताब्यात का दिली?, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला. 


मुस्लिम धर्माच्या लोकांनी डोकी शांत ठेवा -
आजचा अनंत चतुर्थीचा दिवस हा शांततेत जावा, सर्व जाती धर्माच्या लोकांनी संयम ठेवावा. जे मी परवा तीन तारखेला हेच सांगितलं की विशेष करून मुस्लिम धर्माच्या लोकांनी डोकी शांत ठेवा, ही गरम करून घेऊ नका. निवडणुका जवळ यायला लागलेली आहे त्यामुळेच तुम्ही डोकी शांत ठेवा.. 


ती जी कबर आहे आता राज्य तुमचच आहे ना.. आता महानगरपालिकेमध्ये आमची सत्ता नाही ना? करा तुम्हाला काय करायचं ते, दाखवा ना तुमचा काय मर्द पण आहे तो. तुम्ही कशाला उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर उटसुट प्रत्येक गोष्टींवर दोष देताय..पहिल्यांदा त्या याकुब मेमन ची बॉडी तुम्ही त्याच्या नातेवाईकात दिलीत आणि त्याचं थडग तुम्ही उभं केलंत.. त्याबद्दल पहिली तुम्ही माफी मागा देशाची, असा निशाणा जाधवांनी साधला.