रत्नागिरी : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी (Ratnagiri Rain), रायगड, नवी मुंबई, मुंबईसह ठाण्यात जोरदार पाऊस पडतोय. रत्नागिरीमधील गुहागमरमध्ये (Guhagar Rain) मुख्य बाजारपेठ असलेली शृंगार तळीमध्ये देखील प्रचंड पाणी साचल्याने अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.गुहागरमध्ये घरामध्ये पाणी शिरल्यामुळे दहा जणांचे स्थलांतर तर खबरदारी म्हणून 23 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. आज दिवसभरात गुहागर मध्ये 123 मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
गुहागरमध्ये पावसाचा कहर
मुसळधार पावसामुळे गुहागरमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं.आरे पुल पाण्याखाली गेल्याने गुहागरचा पलीकडील गावांशी संपर्क तुटल्याची माहिती आहे.
रात्री दहा वाजता समुद्राला येणारी भरती महत्त्वाची असल्याची माहिती गुहागरच्या तहसिलदारांनी दिली आहे. तालुक्यातल्या परिस्थितीवर प्रशासनाची नजर असल्याचं देखील त्यांनी कळवलं आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन तहसिलदारांनी केलं आहे.
गुहागरमध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसाचा सर्वच भागात परिणाम दिसून आला. ग्रामीण भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला होता यामुळं वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती.
पोमेंडी गावातील नदीला पूर
गुहागर मध्ये पोमेंडी गावातील नदीला पूर आल्याने दोन वाड्यांशी संपर्क तुटला होता.मुसळधार पावसाचा फटका गावातील स्वयंभू सोमेश्वर मंदिराला बसला असून पहिल्यांदाच मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी गेल्याची घटना घडली आहे. गुहागरमध्ये आज सकाळ पासूनच मुसळधार पाऊस पडत असून अनेक भागातील नागरिकांची तारांबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
नवा नगर, धोपावे भागात समुद्राचे पाणी घरात शिरले आहे तर आरे येथील पुलावरून पाणी जात असल्याने पलीकडच्या गावाशी संपर्क तुटला आहे.
गुहागर मधील नवानगर (घटी) परिसरात पाऊस आणि समुद्राचे पाणी इथल्या रहिवाश्यांच्या घरी शिरले होते. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून समुद्राला भरती नसल्याने पाण्याचा प्रभाव कमी प्रमाणात असला तरीही रात्रीच्या भरतीच्या वेळी पावसाचा जोर वाढल्यास येथील कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ येण्याची शक्यता दुपारी व्यक्त करण्यात आली आहे.
सकाळपासून गुहागर मध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पाणी साचलेलं पाहायला मिळालं. पावसाचा जोर वाढल्याने गुहागर ची मुख्य बाजारपेठ असलेली शृंगारतळी भागात नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले होते. तर गुहागर विजापूर मार्गावर देखील प्रचंड पाणी साचल्यामुळे गुहागर मध्ये वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाचा जोर कायम राहिल्यास गुहागर मधील जन जीवनावर अधिक प्रभाव होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :