Ratnagiri Refinery Survey:  रत्नागिरी जिल्ह्यातील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यातील (Rajapur Taluka) बारसूमध्ये (Barsu) वातावरण चांगलं तापलं होतं. बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. आजही आंदोलक आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे दिसून आले. आंदोलकांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. माती सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 


आज बारसूमध्ये दिवसभरात नेमकं काय घडलं? जाणून घ्या महत्त्वाच्या 10 घडामोडी 


1. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आज रत्नागिरीत दाखल झाले. सकाळी राजापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासोबत चर्चा जवळपास तासभर बंद खोलीत चर्चा केली. 


2. या चर्चेनंतर विनायक राऊत यांनी आंदोलक ग्रामस्थांची भेट घेतली. त्यांनी आंदोलनात सहभाग घेत रस्त्यावर ठिय्या मांडला. 


3.  खासदार विनायक राऊत हे आंदोलनात उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून त्यांना राजापूर पोलीस ठाण्यात आणले.


4. राजापूर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर जवळपास अर्ध्या तासानंतर स्थानिक आमदार राजन साळवी पोलीस ठाण्यात खासदार विनायक राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झाले. 


5. त्यानंतर बारसू येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. बारसू येथे ग्रामस्थ आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. माती सर्वेक्षण करण्याच्या ठिकाणी त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला.


6.  पोलिसांनी आंदोलकांना पांगवले. या दरम्यान, पोलीस-आंदोलकांमध्ये झटापट झाली. काही आंदोलक जखमी झाले. लाठीमाराच्या घटनेनंतर खासदार विनायक राऊत पोलीस ठाण्यातून बाहेर आले. 


7. पोलिसांच्या लाठीमारानंतर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले. खासदार विनायक राऊत यांनी जखमी आंदोलक ग्रामस्थांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. 


8. रिफायनरी विरोधी आंदोलकांनी तीन दिवस आंदोलन स्थगित करण्याची मागणी केली. प्रशासनाने अटक केलेल्या आंदोलकांची सुटका करावी, माती सर्वेक्षणाचे काम थांबवावे आदी मागण्या करण्यात आल्या. माती सर्वेक्षणाचे काम सुरू राहिल्यास  आंदोलनाचा इशारा देण्यात आला. 


9. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार यांनी आंदोलकांची आंदोलनस्थळी भेट घेतली. त्यांनी चर्चेचे आवाहन करताना काही प्रतिनिधींची नावे सुचवण्याचे आवाहन केले. मात्र, संतप्त असलेल्या ग्रामस्थांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली. परिणामी मेगामाईकवरून आवाहन करण्याशिवाय प्रशासनासमोर पर्याय राहिला नाही.


10.  रिफायनरी विरोधक संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम यांना आज राजापूर कोर्टामध्ये हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना जामीन मंजूर झाला. त्यानंतर कोर्टातून थेट राजापूर पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. त्यानंतर तिथे पोलिसांनी त्यांच्यावर जामिनाच्या अटी लागू केल्या. यामध्ये जिल्हा बंदीची सुद्धा अट आहे. अशोक वालम यांना दीड महिना जिल्हा बंदी असून त्यांच्या मुलाला 31 मे पर्यंत तालुका बंदी लागू करण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: