Ratnagiri Accident Kashedi Ghat: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे सध्या मुंबईतील चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. कोकणातील (Konkan) आपापल्या गावी जाऊन गणपतीची तयारी करण्यासाठी अनेक मुंबईकर आतापासूनच गावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या कोकणात जाणाऱ्या एसटी महामंडळ आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेसची(Bus fire) संख्या वाढली आहे. अशाच एका खासगी बसचा रविवारी पहाटे रत्नागिरीतील (Ratnagiri News) कशेडी बोगद्याजवळ (Kashedi Tunnel) अपघात झाला. या बसला भीषण आग (Fire) लागली. या आगीमध्ये ही खासगी बस संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, खासगी ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस मुंबईतून मालवणात जात होती. या बसमध्ये तब्बल 40 ते 45 प्रवाशी होते. रविवारी पहाटे कशेडी बोगद्याच्या परिसरातून जात असताना या बसचा टायर प्रचंड गरम झाला. त्यामुळे टायरने पेट घेतला. त्यानंतर ही आग वेगाने पसरायला सुरुवात झाली. सुदैवाने ही गोष्ट बसचालकाच्या लक्षात आली. त्याने तातडीने प्रवाशांना सावध करुन बसमधून खाली उतरवले. त्यानंतर बघता बघता संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ही संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली आहे. खेड अग्निशमन दलाला तातडीने या घटेनची वर्दी देण्यात आली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवली. मात्र, तोपर्यंत प्रवाशांचे सर्व सामान जळून खाक झाले. गणेशोत्सव असल्यामुळे बहुतांश प्रवाशी बरेच सामान घेऊन आपल्या गावी जात होते. मात्र, बसला आग लागल्याचे लक्षात येताच हे सर्वजण घाईघाईत खाली उतरले. त्यांना बसच्या डिकीत ठेवलेले हे सामान बाहेर काढायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे आगीमध्ये हे सर्व सामान जळून खाक झाले. मात्र, सुदैवाने एकाही प्रवाशाला दुखापत झाली नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना दुसऱ्या बसने पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले.
Konkan Railway Ganpati trains: गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या गणेशभक्तांचे ठाणे रेल्वेस्थानकात हाल
सध्या गणेशोत्सवात कोकणात निघालेल्या रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. ठाणे स्थानकात थांबणाऱ्या कोकणात जाणाऱ्या प्रमुख रेल्वे गाड्या जर बघितल्या तर कोकण कन्या एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, कोकण विशेष एक्सप्रेस या गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात कोकणवासियांची प्रवास करण्याची इच्छा असते मात्र त्याच गाड्यांना प्रचंड गर्दीही बघायला मिळते. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकणात निघालेल्या कोकणवासिय गणेश भक्तांचे हाल सुरू आहेत. ठाणे स्थानकात फलाट क्रमांक ७ वर कोकणकन्या एक्सप्रेसच्या जनरल बोगीमधुन प्रवास करण्यासाठी रांग लावण्याऐवजी प्रवाशी आपल्या कुटुंबासह फलाटावरच बस्तान मांडून आहेत.कोकणकन्या गाडीने जाण्यासाठी प्रवाश्यांनी काल संध्याकाळ पासुन तब्बल 25 तास आधी ठाणे स्थानकात येऊन रांग लावली. पण या रांगेचाच बेरंग झाल्याचे चित्र आहे.रेल्वेने रांगेची जबाबदारी आरपीएफकडे सोपवली आहे. मात्र प्रवाशांना सुविधा पुरवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा