Continues below advertisement

रत्नागिरी : जिल्ह्यात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सुरू असलेला वाद काही थांबण्याची चिन्हं नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती करायची की नाही यावरुन वाद सुरू आहे. त्यातच आता नितेश राणे (Nitesh Rane) विरुद्ध उदय सामंत (Uday Samant) वाद रंगण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं थेट आव्हान त्यांनी उदय सामंत यांचं नाव न घेतला दिलं.

कुणाला जर स्वबळाची खुमखुमी असेल तर आपला धनुष्यबाण कसा चालतो हे दाखवण्याची आमची तयारी आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं होतं. त्यालाच नितेश राणे यांनी नाव न घेता उत्तर दिलं. कुणाला जर खुमखुमी मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं नितेश राणे म्हणाले.

Continues below advertisement

Uday Samant On Yuti : नेमकं काय म्हणाले होते उदय सामंत?

महाराष्ट्रात एवढं कुणी बोलत नसेल तेवढं तुमच्या तालुक्यात बोलत आहेत. आम्ही स्वबळावर लढू, आमच्याकडे इतक्या संस्था आहेत, आमच्याकडे इतके कार्यकर्ते आहेत अशी भाषा केली जाते. आपल्याला महायुतीतूनच निवडणूक लढवायची आहे, पण कुणाला जर खुमखुमी असेलच तर आपला धनुष्यबाण कसा चालतोय हे दाखवण्याची तयारीही आमची आहे. शिवसेनेला डिवचण्याचं काम जर कुणी करत असेल तर शिवसेना काय आहे हे सांगण्याचं काम आमचं आहे.

Nitesh Rane On BJP Shivsena Yuti : भाजप कार्यकत्याला सन्मान मिळावा

कार्यकर्त्याला सन्मानजनक वागणूक मिळते का नाही हे पाहणं भाजपचा कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे असं मंत्री नितेश राणे म्हणाले. भाजपाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान मिळावा म्हणून आम्ही बोलतो, पुढच्या काही दिवसांमध्ये काय होतं ते पाहू असं ते म्हणाले.

Nitesh Rane Ratnagiri Speech : आम्हाला हलक्यात घेऊ नका

भारतीय जनता पक्षाची ताकद 2019 ते 2024 या काळात वाढली आहे. गावागावांमध्ये कार्यकर्त्यांचे जाळं निर्माण झालं आहे. आमचं मतदान, आमची ताकद वाढली आहे. रत्नागिरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्याला कमी न लेखता सन्मानपूर्वक युती झाली तर सगळे समाधानी असतील. युती नाही झाली तर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे असं नितेश राणे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी भरपूर काम केले. त्यामुळे कार्यकर्त्याला आता अपेक्षा आहे. कुणी आम्हाला कमी लेखू नये, कुणी आम्हाला हलक्यात घेऊ नये. कुणी आम्हाला पोकळ धमक्या देऊ नये. कुणाला खुमखुमी काढायची असेल, मिटवायची असेल तर आम्ही तयार आहोत असं नितेश राणे म्हणाले.

विरोधकांकडून मतदार यादीतील घोळावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, "मोहम्मद अली रोड, बहराम पाडा किंवा आमच्या इकडच्या काही किनारपट्टी भागांमध्ये दुबार, चौबार मतदार आहे ते दाखवतो. तुम्ही हिंदूंच्या घरामध्ये यादी घेऊन घुसू नका, हिंमत असेल तर मोहल्ल्यामध्ये जा. बुरखा घालून मतदान करणाऱ्या महिला असतात का? मोहल्लामध्ये जाऊन त्यांना बडवण्याची भाषा करा."

अल्पसंख्यांक आयोगाची नोटीस माझ्या हातात आलेली नाही. त्यांनी त्यांचे काम करावे, मी माझे काम करणार. हिंदु राष्ट्रासाठी मी बोलत राहणार. त्यांनी नोटीस पाठवत राहावं असंही नितेश राणे म्हणाले.

ही बातमी वाचा: