Jayant Patil : आगामी लोकसभेसाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून एका जागेची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून चिपळूणमधून प्रशांत यादव निवडणूक लढतील, अशी घोषणा करून टाकली.
पक्षप्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह आमदार राजेश टोपे देखील उपस्थित होते. आम्ही एक एक मतदारसंघ हाताळत आहोत. चिपळूण मतदारसंघात राष्ट्रवादी लढणार आहे, त्यासाठी प्रशांत यादव यांचा चांगला चेहरा आहे. कोकणात आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातुन दूध पाठवतो पण प्रशांतने स्वतः डेअरी उभी केली. ती डेअरी दिपस्तंभाप्रमाणे उभी असल्याचे ते म्हणाले.
कोकणातील शेतकरी कायम शरद पवार यांच्या पाठीशी
जयंत पाटील म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणची जागा निवडून आणली होती. सगळ्या परिस्थितीचा विचार करता राज्याचं राजकारण सगळ्यांनी अनुभवल आहे. शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री असताना अनेकवेळा कोकणाला प्राधान्य दिले. त्यामुळेच महाराष्ट्रातील कोकणातील शेतकरी कायम शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला आहे. शिवसेनेला बरोबर घेऊन आता काम करत आहोत. महाराष्ट्रातील संकटावेळी चांगल्या लोकांना काम करण्याची संधी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, दोन वर्षात दोन मोठे पक्ष फोडले गेले. जनतेच्या मनात याबाबत नारजी आहे. पक्षस्थापना ज्यांनी केली त्यांना प्रश्न विचारले जात आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर खोटं बोलल जात आहेय. आमचा पक्ष सोडून गेले त्यांना पराभूत करायचं असेल तर प्रत्येकाला काम करावं लागेल.
प्रशांत यादव यांनी आपल्यासोबत काम करायचं ठरवलं
जयंत पाटील यांनी सांगितले की, चिपळूण विधानसभा मतदारसंघातील प्रशांत यादव यांनी आपल्यासोबत काम करायचं ठरवलं आहे. चिपळूणची जागा विजयी झालो होतो. खेडची जागा थोडक्यात गेली, तर गुहागरची जागेवर भास्कर शेठ आमदार आहेत. कोकणवासियांनी पवार साहेबांवर अतोनात प्रेम केलं आहे. पवार साहेबांनी केंद्रात काम करताना, मुख्यमंत्री असताना कोकणासाठी काम केलं. वादळ आलं, संकट आलं की पवार साहेबांनी कोकणाला मदत केली कोकणाचा विकास आहे तो कृषीमंत्री असताना जे जे निर्णय झाले ते पवार साहेबांच्या उपस्थित घेतले.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह पवार साहेबांचा
2019 जागा कमी येतील म्हणून हिनवायचे, त्यावेळी 54 जागा आल्या. कोरोना काळात आपण चांगल काम केलं. त्यापैकी राजेश भैया यांनी मोठं काम केलं. त्यानंतर दोन पक्ष फोडले याबद्दल महाराष्ट्र नाराजी व्यक्त करत आहे. हा पक्ष कोणाचा याची चर्चा विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाच्या समोरं होत आहे. कायदा आणि नियम बघितला तर राष्ट्रवादी आणि चिन्ह पवार साहेबांचा आहे अशी आमची खात्री, असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या