खेड: खेड तालुक्यातील लोटे येथील (Lote Gurukul case) अध्यात्मिक वारकरी गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे, अध्यात्मिक शिक्षक प्रितेश कदम आणि एका महिलेविरोधात आणखी एका अल्पवयीन मुलीने लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर पीडित मुलगी व तिच्या आईने संबंधित विकृतांवर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. “आमच्या गरिबीचा आणि विश्वासाचा गैरफायदा (Lote Gurukul case) घेतला... आता न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही,” असा संताप त्या मुलीने व्यक्त केला. “ज्यांनी अध्यात्माच्या नावाखाली (Lote Gurukul case) पाप केलं, त्यांना कायद्याने चांगला धडा शिकवा,” अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा लोटे गुरुकुलातील संशयास्पद कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याआधीही अशाच स्वरूपाच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता ग्रामस्थ आणि सामाजिक संघटना दोघेही आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.(Lote Gurukul case) 

Continues below advertisement

Khed Crime News: ते मी शब्दातही सांगू शकत नाही

तिथे ओपनिंग झाल्यानंतर आठ दिवसांनंतर मी तिथे प्रवेश घेतला. पहिले दोन ते तीन दिवस सगळं व्यवस्थित वाटलं. त्यानंतर माझ्यासोबत त्यांनी गैरवर्तन करायला सुरूवात केली. ते मी शब्दातही सांगू शकत नाही. मी तिथं शिक्षकांना सांगायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी मला धमकी देऊन माझ्यावरती दबाव टाकला. मी लांबून आल्यामुळं मी घाबरले होते, मी माझ्या आत्याला सांगितलं होतं, मात्र तीने देखील माझ्यावर दबाव टाकला. 

Khed Crime News: नेमकं प्रकरण काय?

लोटे येथील आध्यात्मिक वारकरी गुरुकुलात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील विनयभंग प्रकरणाने खेड तालुका हादरला आहे. या प्रकरणात गुरुकुलाचे प्रमुख भगवान कोकरे महाराज आणि शिक्षक प्रीतेश कदम यांच्याविरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेनंतर खेड तालुका तसेच संपूर्ण जिल्हा हादरला असून, समाजातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. वारकरी परंपरेचा मुखवटा लावून अधर्म करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी जनतेची मागणी आहे. पीडित तरुणीने आपल्या जबाबात सांगितले की, “गुरुकुलात आलेले पहिले आठ दिवस चांगले गेले. पण त्यानंतर महाराज वारंवार माझ्या खोलीत येत असत. त्यांनी मिठी मारली, नको तिथे स्पर्श केला. हा प्रकार वारंवार घडत होता. मी भीतीपोटी कोणालाच काही सांगितले नाही. एवढंच नाही तर त्यांनी मला धमकी दिली की, जर कोणाला सांगितलंस तर तुझ्या भावाला संपवू.”

Continues below advertisement

या प्रकरणात गुरुकुलातील शिक्षक प्रीतेश कदम यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.