रत्नागिरी : रत्नागिरीतील दोन तरुण मागच्या 11 दिवसांपासून समुद्रीचाच्यांच्या ताब्यात आहेत. अपहरण झाल्यापासून दोन्ही तरुणाबाबतची कोणतीही माहिती किंवा समुद्रीचाच्याकडून कोणतीही मागणी करण्यात आलेली नाही. रत्नागिरीतील दोन तरुणांसह एकूण 10 खलाश्याचं अपहरण करण्यात आलं आहे. 17 मार्च रोजी आफ्रिकेच्या समुद्रीचाच्यांनी साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ हे अपहरण केलं आहे. जावेद मिरकर आणि रिहान सोलकर अशी रत्नागिरीतील अपहरण करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत.
आफ्रिकेच्या समुद्रात समुद्रीचाच्यांनी एका जहाजावर हल्ला करुन एकूण 10 भारतीय कर्मचारी आणि खलाशांचे अपहरण केले आहे. अपहरण केलेल्या 10 खलाशांमध्ये रत्नागिरीतील 2 तरुणांचा समावेश आहे. मिरकर समीन जावेद आणि सोलकर रिहान शब्बीर अशी या दोघांची नावे आहेत. 17 मार्च रोजी मध्य आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील साओ तोमे आणि प्रिन्सिपे बेटाजवळ हे अपहरण झाले होते. MV Bitu River या जहाजावर हे दोन्ही तरुण कामाला होते. या जहाजावर एकूण 18 कर्मचारी होते. पैकी दहा कर्मचाऱ्यांना समुद्रीचाच्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले आहे. अपहरण झाल्यापासून संबंधित कर्मचाऱ्यांची कोणतीही किंवा समुद्रीचाच्याकडून कोणतीही मागणी अद्याप केली गेलेली नाही. शिवाय अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांशी संवाद देखील साधता येत नाही. त्यामुळे कुटुंबीय अधिक चिंतेत आहेत. परिणामी आता या कुटुंबीयांनी आपल्या मुलांची लवकर सुटका करावी यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. अपहरण झालेल्या दहा कर्मचाऱ्यांपैकी सात भारतीय तर तिघेजण रोमानियान आहेत.
महत्वाच्या बातम्या: