Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे(Ram Mandir) उद्घाटन करणार आहेत. राम मंदिराच्या (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरु आहे. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासाठी निमंत्रण पत्रिकाही वाटल्या आहेत. पीएम मोदी (PM MODI) 22 तारखेला राम मंदिराचे उद्घाटन करतील. तेव्हा सर्वांना 32 वर्षांपूर्वीचा एक फोटो नक्कीच आठवेल. कारण पीएम मोदींनी (PM MODI) 32 वर्षांपूर्वी राम मंदिराबाबत (Ram Mandir) एक मोठा संकल्प केला होता.
काय होता संकल्प ?
पीएम मोदी 32 वर्षांपूर्वी अयोध्येत दाखल झाले होते. 14 जानेवारी 1992 हा दिवस मंदिरासाठी महत्वपूर्ण दिवस होता. तेव्हा पीएम मोदी काश्मीर ते कन्याकुमारी काढण्यात आलेल्या एकता यात्रेत सहभागी झाले होते. या दरम्यान ते अयोध्येतील राम जन्मभूमीत पोहचले होते. या वेळी त्यांनी एक संकल्प केला होता.
तंबूत असलेल्या रामाला पाहून केला होता संकल्प
नरेंद्र मोदी अयोध्येत दाखल झाले तेव्हा त्यांनी राम जन्मभूमीला भेट दिली. तेव्हा राम त्यांना तंबूत दिसला. त्यावेळी पीएम मोदींनी श्रीरामाचे दर्शन घेतले. बराच काळ ते रामाच्या फोटोकडे पाहात राहिले. दर्शन घेऊन मोदी परतत होते. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की, आता तुम्ही पुन्हा अयोध्येत कधी येणार? तेव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते की, "मी मंदिर झाल्यानंतरच अयोध्येत परतेन."
पीएम मोदींनी मुरली मनोहर जोशींसोबत काढली होती यात्रा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1992 मध्ये ही यात्रा काढली होती. तेव्हा मुरली मनोहर जोशी त्यांच्यासमवेत होते. तेव्हा मोदी भाजपचे महासचिव आणि आरएसएसचे माजी प्रचारक या नात्याने केली होती. नरेंद्र मोदी राम मंदिराचा विचार किती गांभीर्याने करत होते याचा अंदाज 1998 मध्ये मॉरीशिसमध्ये आला होता. आंतरराष्ट्रीय रामायण परिषदेत नरेंद्र मोदींनी एक भाषण केले होते. या भाषणात त्यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले होते. शिवाय त्यांनी राम मंदिर बांधायचेच, असा विश्वास व्यक्त केला होता.
कोण जाणार प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला?
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून विविध कलाकार मंडळी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रित करण्यात आलं आहे.आता कोण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार याची उत्सुकता लागली आहे. शरद पवारांनी मी राम मंदिरात गर्दीत जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. आता अजित पवार काय भुमिका घेणार? ठाकरे बंधूपैकी कोण जाणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण
महाराष्ट्रातून एकूण 889 जणांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले असून त्यामध्ये 534 विशेष निमंत्रित आहेत. त्यामध्ये उद्योग, क्रीडा, कला तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे.तर महाराष्ट्रातील 355 साधू - संतांनाही अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या