Rakhi Sawant Acting Academy : बॉलिवूडची 'ड्रामाक्वीन' राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही दिवसांपासून आदिल खान दुर्रानीमुळे (Adil Khan Durrani) चर्चेत आहे. दररोज पतीविरोधात ती नव-नवे खुलासे करत आहे. पण आता रडत बसण्यापेक्षा तिने करिअरकडे लक्ष देण्याचा विचार केला आहे. त्यादृष्टीने पाऊल उचलत तिने आता अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे. 


राखी सावंत देणार अभिनयाचे धडे


'ड्रामाक्वीन' राखी सावंतने दुबईत अभिनयाची कार्यशाळा सुरु केली आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून राखी नवोदित कलाकारांना तसेच अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मंडळींना अभिनयाचे धडे देणार आहे. तसेच त्यांच्यासाठी बॉलिवूडचं दार खुलं करणार आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी म्हणाली की, "मी अभिनयाची कार्यशाळा सुरु केली असून या कार्यशाळेच्या माध्यमातून मी दुसऱ्या देशातील अभिनयाची आवड असलेल्या मंडळींना अभिनयाचं प्रशिक्षण देऊन त्यांना बॉलिवूडमध्ये काम मिळवून देणार आहे."


राखी सावंतचा म्युझिक व्हिडीओ (Rakhi Sawant Music Video)


राखी सावंतचा नवा म्युझिक व्हिडीओ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहणारी राखी या म्युझिक व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान स्पॉट झाली होती. म्युझिक व्हिडीओमधील राखीचा लुक खूपच हटके आहे. तिच्या ग्लॅमरस लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दु:खाचा विसर पडावा यासाठी राखीने आता करिअरकडे पुन्हा एकदा लक्ष देण्याचा निर्णय घेतला आहे. 


राखी सावंत आणि आदिल खान 2022 साली लग्नबंधनात अडकले होते. त्यावेळी राखी म्हणाली होती की, राखीचा पती कर्नाटकातील एका शोरुमचा मालक आहे. पण आदिल झोपडपट्टीत राहतो आणि तो कोणत्याही शोरुमचा मालक नाही ही गोष्ट राखी आदिलच्या घरी गेल्यानंतर तिला कळाली. राखीने आदिलवर फसवणुकीचे आरोप केले असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. 


राखी सावंत ट्रोल (Rakhi Sawant Troll)


राखी सावंत तिच्या सासरी गेली असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकीकडे राखीच्या हिंमतीला लोकांनी दाद दिली आहे. तर दुसरीकडे वाईट पद्धतीने तिला ट्रोल करण्यात येत आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे,"ओव्हर अॅक्टिंग". दुसऱ्याने लिहिलं आहे की, "लग्नाआधी आदिलचं घर पाहिलं नव्हतं का? नाटक करणं बंद कर". 






संबंधित बातम्या


Rakhi Sawant On Adil : "आदिल ड्रायव्हर आहे, झोपडपट्टीत राहतो"; सत्य समोर येताच राखी हादरली