Raj Thackeray: इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी  मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तृतीय भाषा म्हणून अनिवार्य असेल. इयत्ता पहिलीपासून हिंदी विषयाची सक्ती करण्याचा निर्णय सरकारच्या वतीनं घेण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (National Education Policy) अनुसरून येत्या शैक्षणिक वर्षापासून (Academic Year) टप्प्याटप्प्यानं हा बदल लागू करण्यात येणार आहेत. दरम्यान मराठी आणि इंग्रजीसोबत (English Language) हिंदी सक्तीच्या (Hindi Language) निर्णयावरून राज ठाकरेंनी (Raj Thackeray) या पूर्वीच संघर्षाचा इशारा दिला होता. अशातच आमच्या राज्यातील कोवळ्या विद्यार्थ्यां दुसऱ्या प्रांताची भाषा का लादत आहात? आम्ही हे धोरण खपवून घेणार नाही. केंद्रात पंतप्रधान मोदी, अमित शाह असताना त्यांच्या गुजरात राज्यासह इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचाय. जर आमच्या राज्यात आमच्या भाषेचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ आहे, असा थेट इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिलं आहे.हिंदी सक्तीच्या शासन निर्णयावर आजच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

Continues below advertisement

महाराष्ट्रात इतर भाषेचा सन्मान राखलो जातो, तसेच आमच्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. सरकार हिंदी भाषा थोपवू पाहत असेल तर मनसे हे खपवून घेणार नाही. जाणीवपूर्वक सरकार हिंदी मराठी हा मुद्दा करत आहे का? प्रत्येक राज्यात त्या ठिकाणी असलेल्या भाषेचा सन्मान राखला पाहिजे. ते होणार नसेल तर संघर्ष अटळ आहे आणि याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा थेट इशारा आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला आहे.

उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे- राज ठाकरे

हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही, जीचा काही उपयोग नाही, अशी भाषा शिकवू नका. सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्रद्रोह समजू.  आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव आहे का? असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 

Continues below advertisement

मोदी, अमित शाह यांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रातच का?

गुजरात सरकारचा जीआर आहे, पहिलीपासून गुजराती, गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे. तिथ देखील हिंदी भाषेची सक्ती नाही. महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातील बंधू भगिनी शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासाठी ही माझी पत्रकार परिषद आहे. लेखक, साहित्यिक, कलाकार यांना विनंती आहे की तुम्ही यावर बोलायला हवं. मराठी संपवून हे टाकतील. शाळा हिंदी कशी शिकवतात हेच आम्ही बघू, सरकारला हे आव्हान वाटत असेल तर ते त्यांनी आव्हान समजावं. मोदी, अमित शाह यांच्या राज्यात सक्ती नाही मग महाराष्ट्रात का? 

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार, तिथे मराठी शिकवणार का? गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही. जर आज यांनी हिंदी लादली तर मराठी भाषेवर कायमचा वरवंटा फिरेल. तुम्ही आम्ही मराठी आहोत कारण आपण ती भाषा बोलतो. ही भाषा मेली तर आपल्या मराठीपणाला काय अर्थ उरेल?

हे ही वाचा