Chhatrapati Sambhajinagar Crime : पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यातील राजकीय वाद आता थेट रस्त्यावर उतरल्याचे चित्र समोर आले आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली असून, या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

ही घटना ब्रिजवाडी रमाई चौक गल्लीत, मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. सोशल मीडियावर इम्तियाज जलील यांच्या विरोधात पोस्ट टाकल्याच्या कारणावरून, बालाजी खोतकर, मनोज भारसाखळे, किरण साळवे आणि सावजी म्हस्के या चौघांनी शिरसाट समर्थकाला घरासमोर येऊन मारहाण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल

दरम्यान, याच घटनेच्या पार्श्वभूमीवर 27 वर्षांच्या महिलेनं दुसरी तक्रार दाखल केली आहे. तिच्या म्हणण्यानुसार, ती आणि तिचे पती बालाजी खोतकर हे विजय चाबुकस्वार, किरण अंगुरे आणि शुभम अंगुरे या शेजाऱ्यांच्या सततच्या भांडणांनी त्रस्त होते. त्यांनी याबाबत विचारणा केली असता, तिघांनी मिळून खोतकर यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून, एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Continues below advertisement

इम्तियाज जलील आणि संजय शिरसाट यांच्यात वाकयुद्ध

गेल्या काही दिवसांपासून एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यात तीव्र वाकयुद्ध रंगले आहे. इम्तियाज जलील यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocities Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जलील यांनी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, “संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माझ्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून दबाव टाकला. ‘तत्काळ गुन्हा दाखल करा, अन्यथा बदल्या करीन,’ अशा शब्दांत त्यांनी धमकी दिली.” जलील पुढे म्हणाले, “पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः मला सांगितले की, साहेब, आमच्यावर दबाव आहे. आम्ही काय करावे? संजय शिरसाट आम्हाला धमक्या देत आहे, असा आरोप त्यांनी केलाय.

आणखी वाचा

Chhatrapati Sambhajinagar Crime : संतोष लड्डांच्या घरातील पैशांची माहिती जवळच्या मित्रानेच बाहेर फोडली, जादूटोण्याने चोरीचा प्लॅनही आखला, पण...