अखेर विदर्भातही पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Jun 2017 03:24 PM (IST)
NEXT
PREV
नागपूर : राज्यात सर्वत्र पावसानं हजेरी लावूनही पावसाची विदर्भात गैरहजेरीच पहायला मिळत होती. पण आज विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोलीमध्ये पावसानं हजेरी लावली. आज बरसलेल्या पावसाने बळीराजा सुखावला असून, पेरण्यांच्या कामांना वेग आला आहे.
गडचिरोलीमध्ये आज मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. आज सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांसोबतच सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. आज बरसलेल्या पावसामुळं जिल्ह्यात पेरणीच्या कामांनाही आता वेग आला आहे.
तर तिकडे वर्धा जिल्ह्यातील अनेक भागांत पावसानं जोरदार बॅटिंग केली. ढगांच्या कडकडाटासह आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या लोकांना सुखद दिलासा मिळाला आहे.
याशिवाय चंद्रपूर शहरातही सकाळपासून ढगाळ वातावरण होतं. पावसाच्या जोरानं आता पेरणीच्या कामांनाही वेग आला आहे.
गेल्या कित्येक दिवसात पावसानं विदर्भाकडे पाठ फिरवली होती. तेव्हा आज सकाळपासून विदर्भातील जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं सर्वसामान्यांसह बळीराजाही सुखावला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -