मुंबई: रेल्वेतल्या पँन्ट्रीकारमध्ये प्रवाशी दाम्पत्याला केलेल्या मारहाणीप्रकरणी पॅन्ट्री स्टाफच्या 20 जणांना 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

 

भाईंदर परिसरात राहणाऱ्या गुप्ता परिवाराला रविवारी रात्री कोटा ते रतलाम प्रवासादरम्यान रेल्वे पँट्रीकार मधल्या 20 कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती. रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीच्या पाण्याची बाटली का दिली? याचा जाब विचारणाऱ्या गुप्ता यांना पँट्रीकारमधल्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केली होती.

 



 

एका प्रवाशानं सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केला. त्यानंतर रेल्वेच्या ट्वीटर हँडलरवर तक्रार दाखल केल्यानंतर रेल्वे पोलिसांनी पँट्रीकारच्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 



 

काय आहे नेमकं प्रकरण:

 

भाईंदरला राहणारे व्यापारी प्रदीप गुप्ता आणि त्यांची पत्नीसह कुटुंबातले 12 जण गरिबरथ एक्स्प्रेसने प्रवास करत होते. यावेळी रेल्वेत मिळणाऱ्या रेल नीर ऐवजी दुसऱ्या कंपनीची पाण्याची बाटली का दिली हे विचारायला गेलेल्या गुप्ता यांच्या पत्नीला पँट्रीकारच्या कर्मचाऱ्यांनी चक्क मारहाण केली. ज्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

 

संबंधित बातम्या:

 

जाब विचारणाऱ्या जोडप्याला रेल्वे पँट्री कर्मचाऱ्यांची मारहाण