डोंबिवलीत रेल रोको करणाऱ्या दोन हजार जणांवर गुन्हा दाखल
एबीपी माझा वेब टीम | 12 Jan 2017 08:48 PM (IST)
कल्याण: डोंबिवली रेल्वे रोकोप्रकरणी रेल रोको करणाऱ्या तब्बल दोन हजार नागरिकांवर डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्थानकाजवळ नागरिकांनी रेल रोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. डोंबिवली स्टेशनच्या बाजूला अनधिकृत झोपडपट्टी हटवण्याची मोहिम सुरु होती. त्यामुळे, संतापलेले लोक या मोहिमेला विरोध म्हणून ट्रॅकवर उरले होते.डोंबिवली स्टेशनवरुन येणारी- जाणारी वाहतूक थांबवली होती. या आंदोलनामुळे मुंबईकडे जाणाऱ्या सर्व लोकल आणि एक्सप्रेस गाड्या खोळंबल्या होत्या. संबंधित बातम्या