Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग आहे. सरकारला जाग आणण्यासाठी मनसेचे हे आंदोलन असल्याचे मत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत भरता येत नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai Goa highway) चाळण झाली आहे. या मुद्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. कोकणी बांधवांनी जमिनी विकू नयेत असे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केलं


जी माणसं तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात सत्ता देता


रायगड जिल्ह्यातील कोलाड इथं राज ठाकरे बोलत होते. गेल्या 15 वर्षात मुंबई-गोवा महामार्गावर अपघातामुळं अडीच हजार जणांचा मृत्यू झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. 17 वर्षापासून हा रस्ता का होत नाही, याचे उत्तर म्हणजे तुम्हाला राग येत नाही असे राज ठाकरे म्हणाले. जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा असे आवाहन कोकणी बांधवांना असल्याचे राज ठाकरे म्हणाले. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्ष खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही असे राज ठाकरे म्हणाले. या रस्त्यावर खड्यामुळे किती अपघात झाले असतील किती माणसे गेली असतील असे राज ठाकरे म्हणाले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतही असो. आजचं असो किंवा कालचं असो. सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन आलेलं नसतं असे राज ठाकरे म्हणाले.


 मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक


1995 साली बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की, मुंबई-पुणे रस्ता दोन तासात पार करता येईल, असा तयार करायचा आहे. ज्या महाराष्ट्रानं प्रत्येक वेळी देशाचं प्रबोधन केलं, देशाला दिशा दिली. मुंबई-एक्सप्रेस झाल्यावर देशाला कळाले की अशा प्रकारचा रस्ता बांधला जाऊ शकतो असे राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. या रस्त्यानंतर चांगले रस्ते होऊ लागल्याचे ठाकरे म्हणाले. मुंबई-पुणे रस्ता हा देशाला दिशादर्शक रस्ता असल्याचे ठाकरे म्हणाले. ज्या महाराष्ट्रानं देशाला आदर्श घालून दिला, त्या महाराष्ट्रातील मुंबई-गोवा रस्त्याची अवस्था काय असे राज ठाकरे म्हणाले. 


कोणीही जमिनी विकू नका, राज ठाकरेंचं कोकणी बांधवांना आवाहन


मुंबई-गोवा महामार्गावर नीट न करण्याचे कारण म्हणजे अत्यंत कमी किंमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेत आहेत. ज्यावेळी हा रस्ता होईल त्यावेळी 100 पट किंमतीन तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार. त्यामुळं कोणीही जमिनी विकू नका असे राज ठाकरे म्हणाले. आपल्याकडे कुंपनच शेत खात असल्याचे राज ठाकरे म्हणाले. आपलेच लोक आपल्या लोकाकडून कमी किंमतीनं जमिनी घेऊन जास्त किंमतीनं व्यापाऱ्यांना विकत असल्याचे राज ठाकरे म्हणाले.