रायगड : दहावीत शिकणाऱ्या श्रेयस नगरकरचा संशयास्पद मृत्यू  झाला आहे. स्वत:च्याच हातातील बंदुकीची गोळी लागून श्रेयसचा मृत्यू झाला आहे.  श्रेयसची हत्या की आत्महत्या? याबाबचत  संभ्रम कायम आहे. सुयशच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण? असा सवाल देखील या निमित्ताने (Raigad Crime News)  उपस्थित होत आहे. बंदुकीतून सुटलेली गोळी की वडिलांचा हलगर्जीपणा अशा चर्चा सध्या सुरू आहे. 


महाड शहरात राहणाऱ्या सुयश नगरकर या पंधरा वर्षाच्या मुलाचा एका बंदुकीतून सुटलेल्या गोळीमुळे  मृत्यू झाला आहे.  घरी बंदूक बाळगणे हा त्यांचा कोणता छंद नव्हता मात्र वडिलांचा वडिलोपार्जित व्यवसाय असलेला सोन्याची कारागिरी आणि सोने चांदी या दागिन्यांची सुरक्षा वाढविण्यासाठी हे व्यवसायिक आपल्याकडे शस्त्र सुरक्षिततेसाठी वापरतात. मात्र अशा शस्त्राचा आपल्याच परिवारात दुरुपयोग होइल हे स्वप्नात सुद्धा विचार न केलेल्या नगरकर कुटुंबावर मात्र ही वेळ आली आहे.


 श्रेयसची हत्या की आत्महत्या?


8 ऑगस्ट गुरुवारी सुयश हा नेहमीप्रमाणे आपल्या घरामध्ये खेळत असताना त्यांनी घरामध्ये असणारी वडिलांची परवाना असलेली  बंदूक कोणत्या कारणास्तव घेतली हे अद्याप अस्पष्ट नसले तरी त्या बंदुकीसोबत तो खेळत होता. खेळता खेळता  त्यातून सुटलेली गोळी आरपार सुयशच्या डोक्यातून गेली अन् यामध्ये सुयशचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोहचून पोलीसांनी चौकशी केली मात्र कोणताही पुरावा यासंदर्भात अद्याप मिळालेला नसला, तरी हे काम त्याच्याकडून अनवधानाने घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.


पालकांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे


सुयशच्या मृत्यूमागे काय कारण असू शकतं हे मात्र अद्याप अस्पष्टच आहे. व्यवसायाने सुयशचे वडील हे सोनार काम करतात.  माञ आज अशी काय घटना त्यांच्यावर ओढवली त्यात त्यांच्या स्वत:च्या पोटच्या मुलाला त्यांनां आपल्याच घरी बाळगलेल्या शस्त्रामुळे गमवावे लागले. मुलांच्या बाल्यावस्थेत पालकांनी आपल्या घरातील घातक आणि मुलांना न हाताळता येणारी एखादी वस्तू कुठे आणि कशी ठेवावी या संदर्भातील आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.


श्रेयसच्या घरची परिस्थिती कशी होती?


व्यवसायाने नगरकर हे एक सोन्या चांदीचे छोटीशी पेढी महाड शहरात चालवतात. अत्यंत साधे राहणीमान आणि कोणाशीही कसला वाद नसलेले मात्र आज त्यांच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे. श्रेयस हा दहावीत शिकत होता,आई साक्षी सुनील नगरकर या एका खाजगी दवाखान्यात नोकरी करत आहेत. नगरकर यांच्या घरातील परिस्थिती ही सर्वसामान्य कुटुंबासारखी मात्र त्यांच्यावर उद्भवलेली  परिस्थिती दुःखाच्या डोंगराएवढीच म्हणावी लागेल.


हे ही वाचा :


महाडमध्ये वडिलांच्या बंदुकीतील गोळीने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, अपघात, घात की आत्महत्या, तपासाकडे सर्वांचं लक्ष!