Raigad Irsalwadi Landslide Live Updates :इर्शाळवाडीत प्रशासनाच्या मदतीला गावातील लोक आणि त्यांचे नातेवाईक...

Irsalwadi Landslide Live Updates : रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली. यामध्ये 100 हून अधिक लोक अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सत्यम सिंह Last Updated: 21 Jul 2023 04:44 PM

पार्श्वभूमी

Raigad Irsalwadi Landslide Live Updates : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं बुधवारी रात्री रायगड (Raigad) जिल्ह्यातील खालापूरजवळील इरशाळवाडीवर (Irshalwadi) (इर्शाळगड) इथं दरड (Landslide) कोसळल्याची घटना घडली....More

Kavnai Landslide : इगतपुरीतील कावनई किल्ल्याचा भाग कोसळला,  सुदैवाने जीवितहानी नाही 

Kawanai Fort :  इगतपुरी तालुक्यातील प्राचीन गाव असणाऱ्या कावनई येथील किल्ल्यावरून दगडी दरड खाली कोसळली. पोकळ झालेल्या भुभागातील वजनदार दरड खाली घरंगळत आली. सुदैवाने कुठल्याही प्रकारचे जीवित हानी झाली नसली गावकऱ्यांनी सावध राहावे असा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील प्रसिद्ध असा 14 शतकातील कावनई किल्ल्याचा काही भाग थोड्या वेळापूर्वी कोसळला आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, अशी माहिती समोर येत आहे.