Raigad News :रायगड (Raigad) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. माणगावच्या देवकुंड धबधब्यात (Devkund Waterfall in Mangaon ) दोन पर्यटक बुडाल्याची घटना घडली आहे. पुण्यातून 17 जणांचा ग्रुप फिरायला आला होता. धबधब्याखाली आनंद घेत असताना दोघे बुडून बेपत्ता झाले आहेत. या घटनेटी माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. बचाव पथकांना पाचारण केलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. ही नेमकी घटना घडली कशी? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. 

Continues below advertisement

पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे? 

एकूण पुण्याहून 17 पर्यटक फिरण्यासाठी रायगड जिल्ह्यात आले हेते. यावेळी ते सर्वजण माणगावच्या देवकुंड धबधब्यावर गेले होते. यावेळी दोन पर्यटक बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, देवकुंड धबधब्यासह माणगाव मधील वर्षा पर्यटन स्थळांवर निर्बंध असताना देखील पर्यटकांची हुल्लडबाजी सुरु आहे. या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही पर्यटक धबधब्यावर पोहोचले कसे? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 

नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना, नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

नंदुरबार जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. नवापूरमध्ये नदीत बुडून दोन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवडा बाजार परिसरातील रंगवाली नदीच्या शेंड्या डुब येथे ही घटना घडली आहे. आंघोळीसाठी गेलेल्या तिघांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकावर उपचार सुरु आहेत.

Continues below advertisement

या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये आवेश अजिज मक्राणी (10) आणि अमान जावीद सैय्यद (13) यांचा समावेश आहे. फरान अजिज मक्राणी (13) याची प्रकृती स्थिर; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डॉ. युवराज पराडके व वैद्यकीय पथकाचे जीव वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. यामध्ये सख्ख्या दोन भावांपैकी लहान भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मक्राणी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. नवापूर पोलिसांकडून पंचनामा व पुढील कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे. नदी, तलाव व धोकादायक जलसाठ्यांमध्ये मुलांनी आंघोळ करु नये, पालकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात  आलं आहे.