मुंबई : भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (आयआरसीटीसी) (IRCTC) ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष रेल्वेची घोषणा केली होती. आता, उद्या म्हणजे 9 जूनपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेत सुरू होते आहे. ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ अंतर्गत उद्यापासून ही यात्रा  सुरू होत असून विशेष म्हणजे ही रेल्वे पहिल्याच दिवशी रायगड किल्ल्याला येथे भेट देणार आहे. या रेल्वेचा एकूण 5 दिवसांचा महाराष्ट्रभर प्रवास असणार आहे. सकाळी साडे दहा वाजता ही रेल्वे सीएसएमटी मुंबई वरून माणगाव रेल्वे स्थानकात पोहचणार आहे. त्यानंतर, प्रवाशांना येथील रायगड (Raigad) किल्ल्यावर जाऊन किल्ले (Fort) रायगड पाहता येईल. 

Continues below advertisement


नुकतेच 6 जून रोजी किल्ले रायगडावर मोठा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवभक्त येथे अभिवादन करण्यासाठी जमले होते. विशेष म्हणजे किल्ले रायगडवर पर्यटनासाठी व शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जाणून घेण्यासाठीही दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आता, रेल्वे विभागाने शिवाजी महाराजांच्या नावानेच एक विशेष पर्यटन ट्रेन सुरू केली आहे. रायगड, प्रतापगड, लाल महाल, कोल्हापूर, पन्हाळा अशा ऐतिहासिक ठिकाणांना ही ट्रेन भेट देणार असून उद्यापासूनच या रेल्वे गाडीचा शुभारंभ होत आहे. विशेष म्हणजे, प्रवाशांची अगोदरच यासाठी बुकींगही केलं आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेचा प्रवास पुढीलप्रमाणे असणार


 शुभारंभ दिनांक: 9 जून 2025


कालावधी: 5 दिवस /5 दिवसांची यात्रा (सकाळी समाप्ती)


प्रारंभ व समाप्ती स्थान: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई


प्रवास सुरु व संपण्याचे स्थानक : दादर, ठाणे


यात्रेचा प्रवासमार्ग  पुढीलप्रमाणे 


मुंबई (सीएसएमटी)-रायगड-पुणे-शिवनेरी-भीमाशंकर-प्रतापगड-कोल्हापूर-पन्हाळा- मुंबई. म्हणजे, मुंबई, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 4 जिल्ह्यातून ही ट्रेन ऐतिहासिक पर्यटन घडवणार आहे. 


🏰 प्रमुख स्थळांना भेट, कुठे होणार पर्यटन 


रायगड किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक येथे झाला व ही राजधानी होती.


लाल महाल, पुणे – छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण येथे गेले.


कसबा गणपती व शिवसृष्टी,पुणे –पुण्याचे ग्रामदैवत व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील संग्रहालय.


शिवनेरी किल्ला – छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ.


भीमाशंकर ज्योतिर्लिंग – १२ ज्योतिर्लिंग पैकी एक प्रमुख धार्मिक स्थळ.


प्रतापगड किल्ला – अफझल खानावरील ऐतिहासिक विजयाचे ठिकाण.


कोल्हापूर – महालक्ष्मी मंदिर


पन्हाळा किल्ला – बाजीप्रभू देशपांडे यांच्या शौर्याचे प्रतीक.


हेही वाचा


निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; फडणवीसांच्या लेखावर काँग्रेसची मागणी