रायगड : कुंडलिका नदीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रायगडमधील माणगाव तालुक्यातील रेवाळमध्ये घडला. बुडणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तीनही महिलांचा मृत्यू झाला. आतापर्यंत यापैकी दोघांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यास बचाव पथकाला यश आलं आहे. सिद्येश राजेंद्र सोनार (21), सिद्धी गोपीचंद पेडणेकर (16), काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) असं मृतांची नावं आहेत. मृत सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले असता हा दुर्दैवी प्रसंग घडला. 


माणगाव तालुक्यातील रेवाळजे जवळ कुंडलिका नदीत ही धक्कादायक घटना घडली आहे.  सिद्देश राजेंद्र सोनार(21) आणि सिद्धी गोपीचंद पेडणेकर(16) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे.


हे सर्वजण नदीवर पोहण्यासाठी गेले असता खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. यापैकी सिद्देश सोनार हा मुलगा पाण्यात पडला असता या तीन महिला त्याला चांगली वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या. त्यानंतर या चौघांचाही बुडून मृत्यू झाला. 


माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मिळालेल्या दोघांना शव विच्छेदनासाठी दाखल झालं आहे. तर काजल सोनार (26) आणि सोनी सोनार (27) यांचे मृतदेह शोधण्यात येत आहेत. 


आजीच्या गावी आल्या अन्...


बुडालेले सर्वजण नवी मुंबईतील रहिवासी असून शिरवली येथे आजीच्या गावी आले होते. त्यानंतर ते सर्वजण कुंडलिका नदीमध्ये पोहायला गेले. अशात सिद्देश सोनारला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी सिद्धी, काजल आणि सोनी या तिघीही नदीच्या आतमध्ये गेल्या.


सिद्देशला वाचवण्यासाठी गेलेल्या तिघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही. शेवटी त्या सर्वांचाच दुर्दैवी मृत्यू झाला. नवी मुंबईहून आजीच्या गावी आले असताना या चारही जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


ही बातमी वाचा: